Governor Bhagatsingh Koshyari
Governor Bhagatsingh Koshyari|शिक्षण, शेती व सहकारी बँकांप्रश्नांबाबत राज्यपालांशी चर्चा
नाशिक

शिक्षण, शेती व सहकारी बँका प्रश्नांबाबत राज्यपालांशी चर्चा

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

करोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रश्नांना प्राधान्य देत समस्या सोडवाव्यात. पिक कर्ज किंवा अन्य समस्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शिष्ठमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.

नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांच्यासमवेत हे शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या भेटीला गेले होते.

दरम्यान, या प्रश्नांवर सकारात्मक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.

यावेळी औसरी (जि. पुणे) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, प्रगतशील शेतकरी माधव चव्हाण उपस्थित होते. शिक्षण, शेती व सहकारी बँका यांच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. यात गेल्या काही कालावधीपासून शैक्षणिक संस्थांना भेडसावणारा थकीत शिष्यवृत्तीच्या रक्कमेचा मुद्दा देखील मांडला.

टप्प्या-टप्प्याने शासनाने शैक्षणिक संस्थांना रक्कम अदा करत दिलासा द्यावा. विनाअनुदानित संस्था, महाविद्यालयांपुढील अडचणीसमवेत अन्य विविध समस्यांवरही तोडगा काढण्याची मागणी केल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले.

यावेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील शाळा व महाविद्यालय यांना सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळून सुरु केले पाहिजेत असेही या भेटी प्रसंगी सांगितले.

शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या मुद्यावर प्राधान्याने लक्ष द्यावे. तसेच सद्यस्थितीत कर्ज वसुली प्रभावित झाली असून, नागरी सहकारी बँकांपुढे नवीन आव्हाने निर्माण होणार आहेत.

त्यामुळे रिझर्व बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी वेगळे धोरण जाहीर करण्याची मागणी केल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले. शिक्षण, शेती व सहकारी बँकांच्या प्रश्नांसंदार्भातील वेग वेगळी तीन निवेदने राज्यपालांना देण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com