उपोषणकर्त्यांशी आ. कोकाटे यांची चर्चा

 उपोषणकर्त्यांशी आ. कोकाटे यांची चर्चा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

स्थलांतरप्रश्नी मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील Musalgaon Industrial Area केला कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला आमदार माणिकराव कोकाटे MLa Manikrao Kokate यांनी भेट देत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.

कंपनीतील काही कायम कामगारांची बदली जमशेदपुर येथील कंपनीत केल्यामुळे कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पन्नाशीतल्या कामगारांची बदली झाल्याने आपल्या कुटुबियासोबत ते उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यांच्या समस्या कोकाटे यांनी जाणून घेतल्या.

कंपनीत बाहेरच्या युनियन आणल्यामुळे आता ते तुम्हाला साथ देत नसल्याचे कोकाटे यांनी कामगारांना सांगितले. त्यामुळे अंतर्गत युनियन ठेवा. ते तुम्हाला कायम साथ देतील. कंपनीतील वातावरण चांगले ठेवायचे असेल तर कंपनीतील कामगारांचीच युनियन पाहिजे असल्याचे त्यांनी कामगरांना सुचित केले.

यासंदर्भात मंत्रालयात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कामगारांच्या उपोषणाला पोलिस संरक्षण देण्याचे त्यांनी यावेळी पोलिसांना सुचित केले. कामगारांना काही झाल्यास पोसिलांना जबाबदार धरण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त व मालकांसोबत बैठक घेणार

कामगार आयुक्तांसोबत चर्चा केली असून त्यांना तत्काळ बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याच्या सुचना केल्या असल्याचे आ. कोकाटे यांनी सांगितले. प्रशासन आपल्या पाठिशी असून कंपनीच्या मालकासोबतही बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले.

Related Stories

No stories found.