पिंपळगाव नगर परिषदेसाठी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

पिंपळगाव नगर परिषदेसाठी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपालिकेचे नगर परिषदेत (nagar parishad) रूपांतर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health Bharti Pawar) यांनी मुंबई (mumbai) येथे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेत निवेदन (memorandum) देऊन चर्चा केली. भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

20 वर्षांपासून पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) नगर परिषदेचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. शहराची लोकसंख्या आजमितीस 75 हजारांच्या आसपास येवून ठेपली आहे. मुंबई-आग्रा आणि सुरत-शिर्डी महामार्गाच्या (Surat-Shirdi highway) मध्यावर वसलेल्या या शहराचा विस्तार वाढत आहे. त्यामुळे येथे नगर परिषद (nagar parishad) व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव देखील मंजूर करण्यात येवून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरात लवकर पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी आपल्या स्तरावरून पुढाकार घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, भाजपचे बापूसाहेब पाटील, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत घोडके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com