जुन्या नाशकात ‘नव्या’ प्रभागाची चर्चा

4 सदस्यीय प्रभाग पंचवटीत?
जुन्या नाशकात ‘नव्या’ प्रभागाची चर्चा

Discussion of 'new' ward in old Nashik

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीच्या NMC Upcoming Election वातावणात विविध प्रकारच्या चर्चांना उत आला आहे. यामध्ये सोशल मिडियाचा मोठी भूमिका मानली जात आहे. रोज नवनवीन प्रकारे प्रभाग रचने संदर्भात चर्चा होत आहेत. यंदा 122 मध्ये 11 नगरसेवकांची वाढ होऊन एकूण 133 नगरसेवक मनपात निवडून जाणार आहेत.

तर 2011 ची जनगणना गृहीत धरण्यात आल्याने काही प्रभाग नव्याने तयार होणार होते. यात जुने नाशिकमध्ये एक नवा प्रभाग तयार झाल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. तर 4 सदस्यीय प्रभाग पंचवटीत गेल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र प्रशासन अंतिम प्रभाग रचना Ward Structure जाहीर केल्यावरच खरे चित्र समोर येणार आहे.

सध्याचा प्रभाग 15 मधील मोठा भाग व 14 मधील काही भाग समाविष्ट करुन द्वारका व त्यापुढे हा प्रभाग गेल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे प्रभाग 13 चा भाग व पंचवटी अमरधामच्या पुढील भाग जोडून हा नवा प्रभाग तयार झाल्याची चर्चा आहे. यंदा 133 नगरसेवक निवडून जाणार असल्याने 11 सदस्यांची वाढ होणार आहे. तर यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये जनगणनेचे काम न झाल्याने 2011 च्या जनगणनेच्या आधारे म्हणजे सुमारे 15 लाख लोकसख्या गृहीत धरुन मनपाने प्रभाग रचना केली आहे.

तर शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याने नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय तर एक प्रभाग चार सदस्यीय राहणार आहे. पुर्वी या चारच्या प्रभागाची चर्चा सध्याचा प्रभाग 14 मध्ये म्हणजे जुने नाशिकमध्ये होती. मात्र आता हा प्रभाग पंचवटीत गेल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या एक अपक्ष नगरसेवकाने नुकताच राजिनामा दिला आहे, त्याच प्रभाग परिसरात चार सदस्यीय प्रभाग गेल्याचा देखील दावा होत आहे.

नाशिक महापालिकेच्या विशेष पथकाने प्रभाग रचनेसंदर्भातील विवरण मुंबईला जाऊन आयोगाला सुपूर्द केले आहे. तर निवडणूक आयोगाने 17 जानेवारीला विशेष मार्गदर्शक सुचना जारी केल्याने लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वाढली असून चर्चांना देखील उत आला आहे.

‘सेफ झोन’चा शोध सुरू

नव्याने प्रभाग कटींगचा काहींना फायदा होणार आहे, तर काहींना नुकसान. प्रचारात विकास कामांची भाषणे होत असली तरी निवडणूक शेवटी जातीवर जाते, असे बोलतात. यामुळे शहरातील काही दिग्गज आतापासून ‘सेफ झोन’ शोधत असून इतर पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com