मजूर फेडरेशन निवडणुकीत जगदीश पाटलांच्या रणनीतीची चर्चा

मजूर फेडरेशन निवडणुकीत जगदीश पाटलांच्या रणनीतीची चर्चा

पंचवटी । प्रतिनिधी | Panchavati

मजूर फेडरेशनच्या (Labor Federation) निवडणुकीत (election) दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माजी पालकमंत्र्यांपासून ते आजी-माजी आमदार (MLA), खासदार (MP) तसेच नगरसेवक (Corporator) यांनी आपली ताकद लावली होती.

यामध्ये भुजबळ, कोतवाल यांची बाजू सरशी झाली पण एवढ्या मोठ्या दिग्गजांमध्ये चर्चा झाली ती एकाच महिला उमेदवाराची. त्या महिला उमेदवाराला निवडून आणण्याचा इतिहास घडविण्यासाठी जे काही अचूक नियोजन केले गेले होते, ते माजी नगरसेवक तथा गटनेते जगदीश पाटील (Former corporator and group leader Jagdish Patil) यांनी ! त्यांच्या रणनीतीमुळेच विजय सुकर झाला.

नुकतीच मजूर फेडरेशनच्या निवडणूक (election) पार पडली. परंतू या वर्षी झालेल्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील (nashik district) दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येवल्यातील उमेदवारासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Former Guardian Minister Chhagan Bhujbal), तर चांदवड (chandwad) येथील उमेदवारासाठी शिरीष कोतवाल (Shirish Kotwal), सिन्नरमधील (sinnar) उमेदवारासाठी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी आपली ताकद लावली होती. तसेच यांचे समर्थक मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीमध्ये एक नवखी महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सलग तीन वर्ष निवडून आलेले माजी नगरसेवक योगेश (मुन्ना ) हिरे यांच्या समोर उभी होती.

या महिला उमेदवार कुशारे यांच्या पाठीशी माजी नगरसेवक तथा गटनेते जगदीश पाटील हे भक्कमपणे उभे होतें. गेल्या दहा- पंधरा वर्षांचा त्याच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर रणनीती आखली आणि महिला उमेदवाराला निवडून आणले. समोर माजी नगरसेवक योगेश मुन्ना हिरे यांचे कडवे आव्हान होते, ते मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून आलेले होते.

अशा बलाढ्य उमेदवाराचा त्यांनी पाडाव केला. त्यांच्या पाठीशी सीमा हिरे यांचे सारखे आमदार अशी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारास निवडणुकीत पाडणे सोपे नव्हे, ते देखील एका महिलेने. त्यामुळे निवडणूक ही मजूर संस्थेची असली. दिगज उमेदवार निवडून आले असले तरी आजही महिला उमेदवार कूशारे यांच्या विजयाची चर्चा सुरू आहे,याचे सर्व श्रेय हे माजी नगरसेवक तथा गटनेते जगदीश पाटील यांना जाते.

समयसूचकता

निवडणूक म्हटली की मतदार राजाचे महत्व सर्वश्रृत आहे.निवडणुकीच्या दिवशी एक मतदार मतदान केंद्र पोहचत असताना वाहतूक कोंडीत अडकला.मतदानाची वेळ संपत आली होती.मात्र, माजी नगरसेवक तथा गटनेते जगदीश पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांना लागलीच दुचाकीने मतदारास वेळीच मतदान केंद्रा पर्यंत पोहचविण्याचे काम केले.अश्या प्रकारे एक एक मतदार पाटील यांनी जोडला,अन विजयला गवसणी घातली.

मी आज मजूर फेडरेशनवर सलग तीन वर्ष निवडून येणार्‍या माजी नगरसेवका समोर निवडून आली आहे.याचे सर्व श्रेय हे जगदीश पाटील यांना जाते.जणू माझ्या पाठीशी स्वतः जगदीश्वर उभा राहिला.

- शर्मिला कुशारे, नाशिक तालुका संचालक, मजूर फेडरेशन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com