पालकमंत्र्यांतर्फे विकासकामात भेदभाव: माजी आ. रशीद

पालकमंत्र्यांतर्फे विकासकामात भेदभाव: माजी आ. रशीद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) संपुर्ण शहराचे असतांना विकासकामांमध्ये (Development works) मात्र ते भेदभा करत आहेत. गत 20 वर्ष आमदार व दोन वेळा मंत्री असतांना देखील द्याने, रमजानपुरा, म्हाळदे, दरेगाव व सायने या अल्पसंख्यांकांचे (minorities) प्राबल्य असलेल्या भागात त्यांनी ठोस विकासकामे केली नाहीत.

या भागात झालेली विकासकामे (Development works) मनपा निधीतून (fund) तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) शासन कार्यकाळात मंजूर झालेल्या निधीतून झाली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे माजी आ. रशीद यांनी शहरातील रस्ते काम तसेच करोना (corona) काळात ऑक्सिजन प्रकल्पासह (Oxygen project) विविध उपाययोजनेत मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाला असल्याने मनपाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीच्या हजारखोली येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत माजी आ. शेख रशीद (Former MLA Shaikh Rashid) यांनी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्यासह मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi) सडकून टिका केली. हिंदू-मुस्लीम असा भेदभाव (Discrimination) तसेच विकासकामांमध्ये आजपर्यंत सापत्न वागणूक आपण केली नाही हे संपुर्ण शहरातील जनतेस माहित आहे. पालकमंत्री भुसे यांनी विकासकामांमध्ये भेदभाव केला आपण नाही.

मनपात सेनेबरोबर युती असतांना 200 कोटींचा विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार केला गेला. यावेळी सेनेबरोबर भाजप व इतर सहकारी पक्षांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा विकासकामांचे प्रस्ताव मागितले व तसा ठराव महासभेत एकमताने मंजूर झाला होता. असे असतांना 130 कोटीचा नवीन प्रस्ताव तत्कालीन उपमहापौर नीलेश आहेर (Deputy Mayor Nilesh Aher) यांनी आणला. शहराच्या विकासासाठी अधिक निधी मिळत असल्याने या प्रस्तावास देखील आपण विरोध केला नाही. पालकमंत्री भुसे व आयुक्त गोसावी यांनी एकत्र बसून हा प्रस्ताव तयार केला होता.

निधीमध्ये मनपाचा 30 टक्के वाटा असतांना देखील निर्धारीत रक्कमेपेक्षा जास्त रक्कमेचे कामे मंजूर केली गेली. यामुळे मनपास मोठा आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचा आरोप शेख रशीद यांनी पुढे बोलतांना केला. जनतेचा पैसा असलेल्या मनपा निधीची लुट नित्कृष्ट रस्त्यांच्या कामांव्दारे सुरू आहे. कामे झाली नाहीत परंतू बिले मात्र काढली गेली.

करोना देखील मोठा भ्रष्टाचार केला गेला. आपण केलेल्या तक्रारीवरून आयुक्तांची चौकशी सुरू आहे. मनपा भ्रष्टाचाराचे देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून करणार असल्याचे शेख रशीद यांनी सांगितले. यावेळी माजी स्थायी सभापती जफर अहमद व शकील बेग उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com