तब्बल बाविसशे वर्षानंतर अपूर्ण बुद्धलेणीचा शोध

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लेणीं संवर्धकांना अनुपम भेट
तब्बल बाविसशे वर्षानंतर अपूर्ण बुद्धलेणीचा शोध
xx

नाशिक | Nashik

मागील चार दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणींच्या डोंगरात दोन प्राचीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला होता. काल आणखीन एक प्राचीन भिक्खू निवासगृह शोधण्यात आले!

दरम्यान बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ही गोड बातमी मिळाल्याने नाशिकसह बुद्ध लेणींच्या वैभवात आणखी भर पडली आहे. हे प्राचीन भिक्खू निवासगृह अपूर्ण अवस्थेत असून, लेणीं करण्याची प्राथमिक अवस्था दर्शविते. त्यामुळे अभ्यासकांना लेणीं कशी कोरतात? याचा अभ्यास करता ययेणार आहे. स्थापत्यावरून ही लेणीं त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या पेक्षाही आधीची असेल त्यामुळे नाशिक मधील ही "सर्वात प्राचीन" लेणीं असू शकते! असे मत अतुल भोसेकर यांनी मांडले आहे.

या नवीन सापडलेल्या 3 लेणींमुळे महाराष्ट्रातील सर्व बुद्धलेणींची कालमापन तारीख (chronology) बदलू शकेल, असा अंदाज लेणी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

या शोध मोहिमेत सामील असलेले राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षक सहायक अतुल भोसेकर (ट्रिबिल्स), सुनील खरे (लिपीतज्ञ), मैत्रेयी भोसेकर (पुरातत्त्वविद), सलीम पटेल (वरिष्ठ कर्मचारी, ASI), साक्षी भोसेकर आदी या मोहिमेत सहभागी होते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com