पिंपळगावचा दोनशे वर्षांपूर्वीचा घाट मोकळा

तरुणांच्या मदतीतून घाटाला मिळाली नवसंजीवनी
पिंपळगावचा दोनशे वर्षांपूर्वीचा घाट मोकळा

पिंपळगाव बसवंत । Pimpalgoan Baswant

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गाव, वाडी वस्तीची वेगळी ओळख राहिली आहे. मात्र काळाच्या ओघात गावाची ओळख सांगणार्‍या अनेक पुरातन वस्तू नामशेष (Antique extinction) झाल्या आहे.

पिंपळगाव बसवंत (Pimpalgoan Baswant) येथे देखील पाराशरी नदीवर घाट (Ghat on Parashari river) असल्याची माहिती श्रीराम मित्रमंडळाला (Shreeram Mitrmandal) मिळताच या तरुणांनी खोदकाम करत तब्बल दोनशे वर्षांपूर्वीचा घाट (Two hundred year old ghat) व बुरूज उत्खननातून (Tower excavation) परत मोकळे केले आहेत. काळ्या पाषाणातील हे घाट पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

येथील श्रीराम मंदिरालगत पाराशरी नदी असून सध्या नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. येथील बापू पाटील यांच्या संकल्पनेतून श्रीराम मंडळाने हनुमान मंदिराच्या सुशोभिकरणाचे (Hanuman Temple Beautification) काम हाती घेतले आहे. मंडळाच्या सहकार्‍यांना वसंत आंबेकर यांनी पाराशरी नदीकाठी पुरातन घाट असल्याची माहिती दिली. पुराचे पाणी व मातीने भूमिगत झालेले घाट व बुरूज उकरण्याचा संकल्प या तरुणांनी केला.

साहजिकच आठ दिवसांच्या परिश्रमानंतर काळ्या पाषाणातील पाच दगडी घाट उत्खननातून मोकळे करण्यात आले. ते इतके भक्कम आहेत की, दीड वर्षात पाराशरीला अनेकदा महापूर येवूनही ते ढासळलेले नाहीत. हा ऐतिहासिक ठेवा (Historical Place) बघण्यासाठी नागरिकांची राममंदिर परिसरात गर्दी होत आहे. मविप्र चे माजी संचालक दिलीप मोरे, विश्वास मोरे, रवींद्र मोरे आदींनी या घाटाची पाहणी केली.

दरम्यान पाराशरी नदीत महादेवाचे मंदिर असल्याचे पिंपळगावचे माजी सरपंच कै.टी.टी. मोरे यांनी सांगितले होते. उत्खननात महादेवाची पिंड मिळाल्याने त्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. संथ वाहणारी पाराशरी, विविध प्रकारची झाडे अन् पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे श्रीराम व हनुमान मंदिर परिसराचे वातावरण प्रसन्न असते.

श्रीराम मंडळाने पिंपळगावच्या सौंदर्यात अजून भर टाकण्यासाठी लोकवर्गणीतून परिसर सुशोभीकरण हाती घेतले आहे. हनुमान मंदिराला संरक्षण भिंत, वृक्षारोपण, रंगरंगोटी, रोषणाई यासह जॉगिंग ट्रॅक अशी कामे सुरू आहेत. पुरातन घाट व सुशोभीकरणाने हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे.

श्रीराम मंडळाचे बापूसाहेब पाटील, रवींद्र तिडके, श्याम जाधव, प्रभाकर विधाते, रामदास विधाते, गणेश घुमरे, ज्ञानेश्वर खैरनार, अनिल महाले, ऋषिकेश शिंदे, सुरेश जोशी यांनी पुरातन घाट उत्खननासाठी श्रमदान केले. याप्रसंगी पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com