गिरणा नदी पुन्हा खळाळणार; चणकापूरमधून विसर्ग वाढवला

गिरणा नदी पुन्हा खळाळणार; चणकापूरमधून विसर्ग वाढवला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कळवण तालुक्यातील चणकापूर (Chankapur dam tal Kalwan) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Water Catchment area) गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चणकापूरची पाणीपातळी (Chankapur dam water level) वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी दहा वाजेपासून गिरणा नदीपात्रात (Girna river) १ हजार क्युसेक्स पाण्यापेक्षा अधिकचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.

जुलै महिन्यात आलेल्या विक्रमी पावसामुळे (Recordbreak rain in july month) जिह्यातील सर्वच धरणातून (Dam) विसर्गाला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (Dam Storage) ८६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे वरुणराजा पुन्हा बरसल्यास तात्काळ धरणातून विसर्ग केला जाणार आहे.

कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या पावसामुळे चणकापूर धरणातील (Chankapur dam) विसर्ग वाढला आहे. यामुळे प्रशासनाकडून विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील दारणा धरणातून (Darna Dam) २५० क्युसेक विसर्ग होतोय.

तर भोजापूर धरणातून (Bhojapur Dam) ५३९ क्युसेक विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणातून (Palkhed Dam) ४०५ तर आळंदीतून (Alandi Dam) ३० क्युसेकचा विसर्ग (Water Discharge) सुरु आहे. वालदेवी धरणातून (Waldevi Dam) ६५ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

नांदूरमध्यमेश्वरमधून (Nandurmadhyameshwar) ४ हजार ७६९ क्युसेक पाणी जायकवाडीकडे (Jaikwadi) झेपावत आहे. तर होळकर पुलाखाली (Holkar Bridge) नाममात्र २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूं आहे. गंगापूर, कडवा आणि मुकणे धरणातील विसर्ग मात्र बंद करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com