माणिकपुंज धरणातून विसर्ग

माणिकपुंज धरणातून विसर्ग

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) गेल्या तीन दिवसांपासून मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील छोटे-मोठ्या धरणासह माणिकपुंज धरण ओहरफ्लो (Manikpunj dam overflow) झाले आहे....

नांदगाव शहरासह तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच खरीप पिकांना (Kharif crops) जीवदान मिळाले आहे. शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संततधारेने तालुक्यातील भालूर धरण, लोहशिंगवे, लक्ष्मीवाडी धरणे भरले आहे. धरणातून विसर्ग झाल्याने शाकांबरी नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. गिरणाधरण 48 टक्के भरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून वरुणराजा बरसत असल्याने पाणीटंचाई झळ कमी झाली आहे. माणिकपुंज धरणाची 335 दशलक्ष घनफूट एवढी साठवण क्षमता आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील जळगांवबुद्रुक, न्यायडोंगरी, पिंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिगणेदेहरेसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनासाठी हे धरण उपयुक्त ठरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com