Video : दिंडोरीत पावसाचा जोर वाढला; पालखेड धरणातून ६९२० क्युसेस पाण्याचा विसर्ग

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस (Rain) पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे...

या पावसामुळे (Rain) तालुक्यातील धरणाच्या (Dam) साठ्यामध्ये वाढ होत असून पालखेड धरण (Palkhed Dam) ४८ टक्के भरले असून धरणातून कादवा नदीत (Kadwa River) पात्रात ६९२० क्युसेस पाण्याचा विसंर्ग (Water Discharged) सोडण्यात आला. त्यांमुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे करंजवण धरणातील (Karanjvan Dam) पाणीसाठा ११ टक्क्यांवरून वरून २३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर वाघाड धरण (Waghad Dam) ५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहचला आहे.

पुणेगाव धरण पाणीसाठा १० टक्के असताना १९ टक्के इतका झाला असून ओझरखेंड धरणात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून ओझरखेंड धरणाचा पाणीसाठा २८ टक्के इतका झाला आहे तर तीसगाव धरण साठ्यात असून कुठलीही वाढ झालेली नाही.

दिंडोरी तालुक्यात पडलेला पाऊस

दिंडोरी : 68.00 mm

रामशेज : 64.00 mm

ननाशी : 209.00 mm

उमराळे : 62.00 mm

लखमापूर : 55.00 mm

कोशिंबे : 148.00 mm

मोहाडी : 53.00 mm

वरखेडा : 46.00 mm

वणी : 50.00 mm

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे सकाळी 10 वा पालखेड धरणातून विसर्ग वाढवून ६९२० क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल.

- सुदर्शन सानप. शाखा अभियंता पालखेड धरण.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com