त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर
नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २३ रुग्णांना डिस्चार्ज

नागरिकांना दिलासा

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २३ रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये तालुक्यातील बोंबीलटेक (आंबोली) नऊ रुग्ण तर त्र्यंबकेश्वर शहरातील चौदा रुग्ण होते.

त्र्यंबक शहरासह तालुक्यात करोनाला रोखण्यात प्रशासनाला यश येत असून यासर्व करोनामुक्त रुग्णाचे शहरातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. जून महिन्यात त्र्यंबक तालुक्यात करोनाने शिरकाव केला. यानंतर हळहळू प्रभाव वाढत गेला. ग्रामीण पाठोपाठ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनाने कंबर कसत योग्य त्या उपाययोजना केल्या. त्यानंतर आता रुग्णसंख्या कमी होत आहेत. मागील तीन दिवसात २३ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

त्र्यंबक प्रशासन व आरोग्य प्रशासन या पार्श्वभूमीवर पाऊले उचलत असून यासाठी नागरिक सहकार्य आक्रीत आहे. तालुक्यातील कोविड सेंटर मधील रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. तालुका प्रशासन नगरपालिका अधिकारी पदाधिकरी, पोलीस विभाग यांच्यातील समन्वय तसेच करोना गो व्हाटसअप ग्रुप हे लक्ष ठेवून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com