जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ३४४ रुग्ण करोनामुक्त

सद्यस्थितीत ३ हजार २०८ रुग्णांवर उपचार सुरू
करोना
करोना

नाशिक | Nashik

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ११ हजार ३४४ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार २०८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११४, चांदवड ५१, सिन्नर १४७, दिंडोरी ५७, निफाड १६५, देवळा १११, नांदगांव १०८, येवला २०, त्र्यंबकेश्वर २९, सुरगाणा १०, पेठ ००, कळवण ०३, बागलाण ४१, इगतपुरी ६४, मालेगांव ग्रामीण ४९ असे एकूण ९६९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ११५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११९ तर जिल्ह्याबाहेरील ०५ असे एकूण ३ हजार २०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ०५७ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून नाशिक ग्रामीण मधे ७०.७३, टक्के, नाशिक शहरात ७५.९५ टक्के, मालेगाव मध्ये ८४.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.५७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.५३ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ११८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २८२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८५ व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५०५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️१५ हजार ०५७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ११ हजार ३४४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३ हजार २०८ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.५३ टक्के.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com