नियोजन समितीकडून निधी वितरण सुरू

जिल्हा परिषदेकडून ऑक्टोबरअखेरपर्यंत नियोजन
नियोजन समितीकडून निधी वितरण सुरू

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad Nashik सर्व विभागांनी 20121-22 या आर्थिक वर्षात मंजूर नियतव्ययातून जिल्हा परिेषदेने मंजूर केलेल्या कामांसाठी अखेर जिल्हा नियोजन समितीने Planning Committee निधी वितरित करण्यास प्रारंभ केला आहेDisbursement of funds . यामुळे दोन महिन्यांची प्रतीक्षा संपली असून या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यास प्रारंभ होणार आहे.

जिल्हा परिषदेला एप्रिलमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या नियतव्ययानुसार जिल्हा परिषदेने ऑक्टोबरअखेरपर्यंत नियोजन केले.निधी वितरित केला नसतानाही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत निधी न मिळाल्यामुळे कार्यारंभ आदेश अडकले होते.

जिल्हा नियोजन समितीने डिसेंबरमध्ये जिल्ह्याचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा प्रारुप विकास आराखडा प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर निधी देण्याची अट टाकली होती. त्यानुसार मागील आठवड्यात बांधकाम समितीची तहकूब सभा घेऊन त्यात प्रारुप आराखड्याला मंजुरी देऊन तो 30 डिसेंबरच्या आत प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आला.

यामुळे जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेच्या संबंधित कामांनुसार त्या त्या विभागाच्या खात्यांमध्ये निधी वितरित करण्यास प्रारंभ केला आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जवळपास 60 कोटींच्या रस्ते कामांचे नियोजन केलेले आहे. यामुळे ही कामे जानेवारीमध्ये सुरू होऊ शकणार आहे.

जिल्हा नियोजन समितीने निधी वितरित करण्यास प्रारंभ केला आहे. अद्याप बीडीएसवर निधी आला नसला तरी प्रक्रिया सुरू झाली आहे.

सुरेंद्र कंकरेज, कार्यकारी अभियंता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com