जिल्हा प्रशासनास आपत्ती निवारणासाठी निधी

जिल्हा प्रशासनास आपत्ती निवारणासाठी निधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाळ्यात संभाव्य आपत्ती (Potential disaster in the rainy season) लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग (District Disaster Management Department) संबंधित यंत्रणांना कार्यप्रवण करीत असताना आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने द्यावयाच्या मदतीसाठी राज्य शासनाने 29 लाखांचा निधी Fund जिल्हा प्रशासनास उपलब्ध केला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाने महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पशुवैद्यकीय आदी विभागांना सतर्क करीत नियोजनावर भर दिला आहे. संभाव्य आपत्तीत प्रत्येक यंत्रणेने काय काम करावे, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून दिली जात आहे.

जूनच्या पहिल्या नऊ दिवसांत मनमाड वा आसपासचा परिसर वगळता अन्यत्र कुठे पावसाने हजेरी लावलेली नाही. तथापि, जेव्हा पावसाला सुरुवात होते, तेव्हा कसा बरसेल, याचा नेम नसतो. मुसळधार पावसाने तीन, चार दिवसात पूरस्थितीला तोंड द्यावे लागल्याची उदाहरणे आहेत. ही एकंदर स्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर तयारी सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या या कामास निधीची जोड मिळाली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य सरकारची असते. अकस्मात कोसळणार्‍या आपत्तीवेळी तातडीने काही मदत उपलब्ध करावी लागते. पूर, चक्रीवादळ अशा आपत्तीवेळी राज्य सरकार आपत्ती प्रतिसाद निधी पुरवत असते.

पावसाळयात वीज कोसळून मृत्यू, वादळ व पावसात जनावरे मृत होणे, पूरस्थितीवेळी अपघात असे प्रकार घडतात. शासकीय निकषानुसार अशा घटनांमध्ये मदत दिली जाते. आपत्ती निवारण व आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने जिल्ह्यास 29 लाख 16 हजार रुपयांना निधी उपलब्ध केला आहे. हा निधी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com