आरोग्य केंद्र असूनही रुग्णांची गैरसोय

आरोग्य केंद्र असूनही रुग्णांची गैरसोय
देशदूत न्यूज अपडेट

खेडगाव । वार्ताहर | Khedgaon

खेडगाव (Khedgaon) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) नवीन इमारती स्थलांतर करून रुग्णांना (patients) आरोग्य सेवा द्यावी अन्यथा अधिकार्‍यांच्या दालनात उपोषण (hunger strike) व माजी आमदार धनराज महाले (Former MLA Dhanraj Mahale) यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा जाहीर इशारा युवासेना जिल्हाप्रमुख नदीम सय्यद (Youth Sena District Chief Nadeem Syyad) यांनी दिला आहे.

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) राजकीय (politics) दृष्टीने संवेदनशील असणार्‍या खेडगाव (khedgaon) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत (Primary Health Center Building) जीर्ण झाल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून इमारतीचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी (monsoon) पूर्ण झाले असून संबंधित वैधकीय अधिकार्‍यांकडे नवीन इमारतीचा ताबा दिला असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु नवीन इमारतीत वैद्यकीय सोयी सुविधा अपूर्ण असल्याने संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांकडून आरोग्य केंद्राचे काम नवीन इमारतीत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे खेडगावसह परिसरातील रुग्णांची आरोग्य सेवेसाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना तालुक्यातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

तरी दिवाळीपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारती स्थलांतर करून रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी अन्यथा माजी आमदार धनराज महाले, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हाप्रमुख नदीम सय्यद यांनी अधिकार्‍यांच्या दालनात उपोषण व माजी आमदार धनराज महाले यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा जाहीर इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com