इच्छाशक्ती, सामर्थ्याच्या जोरावर अपंगत्वावर मात

इच्छाशक्ती, सामर्थ्याच्या जोरावर अपंगत्वावर मात

प्रवीण पवार यांनी केला व्यवसाय सुरू

येवला | Yeola

अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे, कोणी डोळे नसूनही पुस्तके पाठ ठेवतात, तर कोणी पायाने अपंग असूनही पायाची कामे हाताने तर हाताचे कामे पायाने सहज करताना दिसतात.

यातूनच आपल्याला त्यांनी अपंगत्वावर मात केलेली दिसते. असेच एक उदाहरण वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील प्रवीण पवार यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्ती, सामर्थ्याच्या जोरावर व्यवसाय सुरू करत अपंगत्वावर मात केली आहे.

प्रवीण पवार हे मूळचे वैजापूर तालुक्यातील तलवाडा गावचे. मात्र ते कामानिमित्त येवल्याला स्थायिक झाले आणि ते अस्सल येवलेकर झाले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मात्र, इथं ही अपंगत्व आड आले.

त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यात लहानपणापासून अपंगत्वाने जखडलेलं. त्यामुळे कोणताही व्यवसाय करणं म्हणजे फार जिकरीचचं. अपंगत्वामुळे त्यांना कुठे कामही मिळाले नाही.

म्हणून ते येवल्यामध्ये रिक्षा चालवण्याचे काम करू लागले. सर्व काही सुरळीत सुरु असताना एक वर्ष आधी मार्च महिन्यांत करोनाने येवल्यात एंट्री केली. त्यातून लॉकडाउन, कॅन्टेंन्मेंट झोन असे निर्बंध शहरात वाढले. त्यामुळे लोकांना काळात घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले.

प्रवीण यांना आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, असा मोठा परिवार असल्यामुळे त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवीण यांच्यावर आली.

परिस्थितीवर मात करत लॉकडाऊन काळात त्यांनी हाताला मिळेल ते काम केले. देश करोनाशी लढा देत आहे. आणि दुसरीकडे लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागली आहे. कधी शेतात, तर कधी दुकानावर, असे अनेक कामे ते करू लागले. करोना मुळे भारतात बेरोजगारी वाढली. करोनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. तर काहींचे जगणं मुश्किल केले आहे.

अशा संकटात छोटा मोठा उद्योग व्यवसाय उभारून भरपूर लोक आपलं उदरनिर्वाह चालवत आहे. त्याप्रमाणे अखेर प्रवीण यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून, सर्व समस्यांना छेद देत येवल्यात आपल्या दुचाकीला जुगाडं करत टरबूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

मनामध्ये एखाद काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही. हेच त्यांनी या निमित्ताने दाखून देलं आहे. आज प्रवीण सारख्या अपंग व्यक्तीने नोकरी मिळत नाही, म्हणून निराश झालेल्या युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com