नाशकात दिव्यांगांचा जल्लोष

नाशकात दिव्यांगांचा जल्लोष

नाशिक | Nashik

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांगांच्या (Disabled) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची (Ministry of Independent Disability) प्रमुख मागणी मान्य झाल्याने प्रहार दिव्यांग संघटनेच्या (Prahar Disabled Association) वतीने पंचवटी (Panchvati) येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला...

दिव्यांग हा समाजाचा सर्वात वंचित दुर्बल घटक असून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यासाठी प्रहारचे अध्यक्ष तथा आमदार बच्चु कडू (MLA Bachu Kadu) यांनी सातत्याने विधानसभेत सरकारकडे ही मागणी लावून धरली होती. त्यानुसार स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केल्याने दिव्यांगांनी त्यांचे व बच्चू कडूंचे आभार मानले आहेत.

दरम्यान, यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार, प्रहार जनशक्तीचे उ.म.संपर्कप्रमुख दत्तु बोडके, अनिल भडांगे, कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, भाऊसाहेब सांगळे, संध्या जाधव, समाधान बागल, बच्चू निकाळजे, जीतु सानप , दिलीप पाटील, निलिमा पगारे, रणजित आंधळे, किरण सोनवणे, प्रमोद केदारे, राजु शेख, श्रीहरी क्षीरसागर, काशिनाथ येलमामे, जयंत थेटे, यांच्यासह आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com