पोलीस उपायुक्त चव्हाण यांच्यासह 25 जणांना महासंचालक पदक

पोलीस उपायुक्त चव्हाण यांच्यासह 25 जणांना महासंचालक पदक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस पदक विजेत्यांची पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस दलाच्या झोन एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे 25 अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पोलीस पदक हे घोषित केले जाते. यावर्षी 800 पोलीस कर्मचार्‍यांना हे पदक घोषित झाले आहे. त्यामध्ये पोलीस उपायुक्त चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस अकादमी मधील सुभाष गुंजाळ, पिंटू मोगरे, सुनील ताकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील शंकर गोसावी, काशिनाथ गायकवाड,

नाशिक ग्रामीण मधील मुनीर सय्यद, पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाचे अशोक जगताप, ज्ञानेश्वर शेलार, जयवंत सूर्यवंशी, प्रतिबंधक विभागाचे प्रकाश डोंगरे, अमोल मानकर, कुणाल काळे, चेतन मोठे, संतोष उशीर, इमरान शेख, सोमनाथ निकम, गजानन पाटील, निलेश भोईर, विशाल साबळे, गणेश वाघ, शामकांत पाटील आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com