केंद्रिय कृषीमंत्र्याशी शेतकर्‍यांचा थेट संवाद

केंद्रिय कृषीमंत्र्याशी शेतकर्‍यांचा थेट संवाद

पंचाळे । वार्ताहर | Panchale

प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (Pradhan Mantri Fasal Vima Yojana) पाठशाळेकडून आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्र (mahrashtra), मध्यप्रदेश (madhya pradesh) या राज्यांमधील शेतकर्‍यांशी (farmers) फसल विमा, किसान क्रेडीट कार्ड (Kisan Credit Card), पी. एम. किसान योजनांविषयी (P. M. Farmer schemes) चर्चा करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

यावेळी तालुक्यातील दापुर ग्रामपंचायतमध्येही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शेतकर्‍यांनी (farmers) योजनांविषयी काही बदल करण्याच्या सूचना ना. तोमर यांना केल्या. प्रधानमंत्री फसल विमा योजना ही 2016 सालापासून सुरु झाली असून 20 राज्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. यामध्ये शेतकर्‍यांना वर्षातील खरीप आणि रब्बी या पिकांच्या संरक्षणासाठी ही योजना लागू होते. जास्तीत-जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहचून त्यांचा योजनेत सहभाग वाढण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. 24 एप्रिलला ग्रामपंचायत राज दिवसानिमित्त प्रत्येक गावात ग्रामसभेचे नियोजन करण्यात आले होते.

यादिवशी शेतकर्‍यांना केंद्राच्या सर्व कृषी योजनाची (Agricultural schemes) कल्पना देण्यात आली. तर 27 एप्रिलला सकाळी 11 वा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या (Pradhan Mantri Fasal Vima Yojana) लाईव्ह कार्यक्रमात ना. तोमर यांनी विविध राज्यांतील शेतकर्‍यांची थेट संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे (Maharashtra Agriculture Minister Dada Bhuse), प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले (Principal Agriculture Secretary Eknath Dawale), कृषी आयुक्त धीरज कुमार (Agriculture Commissioner Dheeraj Kumar), सहआयुक्त विनयकुमार आवटे (Joint Commissioner Vinay Kumar Awate) यांनीही शेतकर्‍यांसोबत लाईव्ह संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांना जास्तीत-जास्त सुविधा व कृषी योजना राबवण्याचे संकेत दिले.

या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी निलेश फिरके, सिन्नर तालुका प्रतिनिधी सोपान सहाने, तालुका पिकविमा अधिकारी सुयोग वाजे यांनी वेळोवेळी सूचना देऊन त्याकरीता लागणारे पिक विम्याचे पोस्टर, परिपत्रक आणि माहिती घेऊन पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. दापुर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी पिक विमा योजना व कृषी योजनांविषयी मार्गदर्शन केले.

दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक साळुंखे, ग्रामसेवक बुरसे, तलाठी परदेशी, कृषी सहाय्यक वनिता शिंदे, सरपंच रमेश आव्हाड, उपसरपंच ललिता आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामपंचायत सदस्य मारुती आव्हाड, सोमनाथ आव्हाड, पूनम घुले, वनिता आव्हाड, कविता आव्हाड, सुनिता आव्हाड व शेतकरी सुभाष आव्हाड, काचुनाना आव्हाड, नाना आव्हाड, चंद्रभान आव्हाड, अर्जुन आव्हाड, भाउसाहेब कांदे,मनुभाऊ आव्हाड, बाळू गिरणीवाले, रवी सूर्यवंशी, बबन आव्हाड, शारदा भालेराव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.