...तर साधा थेट अधिकार्‍यांशी संपर्क

विभागातच नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक्षकांचे पाऊल
...तर साधा थेट अधिकार्‍यांशी संपर्क

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

तक्रारींचे निवारण न झाल्यास थेट अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आहवान पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. त्यांनी स्वत:सह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक नागरीकांसाठी जाहिर केले आहे.

तक्रार दाखल न करणे, पोलिसांकडून सहकार्य न मिळणे, दाखल तक्रार, अर्जासंदर्भात माहिती मिळत नसले तर, नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांना थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे दाद मागता येणार आहे. विशेष म्हणजे पोलिस उपअधिक्षकांसह अगदी थेट पोलिस अधिक्षकांकडे नागरिक तक्रार करू शकणार आहेत.

जिल्ह्यात ४० पोलीस ठाणी कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये नागरीकांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास नागरीक थेट नाशिक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत आहेत. तर मुख्यालयासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या कार्यालयांच्या ठिकाणांना भेट देणे सुद्धा नागरिकांना शक्य होत नाही.

पोलीस ठाण्यात तक्रार निकाली निघाली नाही तर, आपआपसातील वाद वाढीस लागतात. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षकांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्धीस दिले आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारीचे समाधान झाले नाही, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, तक्रारीवर कार्यवाही झाली नाही, अर्जाची स्थिती नेमकी काय आहे, याच माहिती देण्यात आली नाही तर कार्यक्षेत्रातील उपविभागीय पोलिस अधिकारी, अथवा अपर पोलिस अधिक्षक वा पोलिस अधिक्षकांशी थेट संपर्क साधावा.

नागरिक प्रत्यक्ष हजर सुद्धा राहू शकतात. अशा तक्रारी किंवा अडचणी मांडल्यास वरिष्ठ अधिकारी त्यांची वेळत दखल घेण्यात येणार असून, तत्काळ तक्रार निवारणासाठी प्रयत्न करतील असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अधिकार्‍यांचे नंबर जाहिर

* पोलिस अधिक्षक सचिन पाटील-७७३८६००००१

* अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्टा वालावलकर ८८८८८००८०९

* चंद्रकांत खांडवी (मालेगाव) ९८२२६३४५००

* नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष व्हॉट्सऍप-९१६८५५११००

------------------------------------

उपविभागीय पोलिस अधिकारी

* अर्जुन भासेले, नाशिक ग्रामीण- ८३९००२६५४९

* भिमाशंकर ढोले, पेठ व कळवण-९८६७७९७७३२

* सोमनाथ तांबे, निफाड-९८८११७६१११

* समरसिंग साळवे, मनमाड-९१४५११९०४९

* शशिकांत शिंदे, मालेगाव ग्रामीण-९७६४८९६९१४

* मंगेश चव्हाण- मालेगाव शहर व कँम्प-९८२३९४०९५१

* शामकुमार निपुंगे, मुख्यालय-९००४८५९००२

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com