नाशिक

श्री काळाराम मंदिरात दिपोत्सव साजरा

मंदिरात दिव्यांची आरास

Kundan Rajput

नाशिक । Nashik

अयोध्या येथे उद्या श्री राम मंदिराचे भुमीपुजन होत असून त्याचा नाशिकमध्येही उत्साह पहायला मिळत आहे. श्री काळाराम मंदिरात महिलांनी भुमिपुजनाच्या पुर्वसंध्येला एकत्र येत दिपोत्सव साजरा करुन रामाची महाआरती केली. यावेळी मंदिरातील गाभारा दिव्यांच्या मंद ज्योतीने उजळला होता.

देशभरात राम मंदिर भुमीपुजनाचा आनंद साजरा केला जात आहे. नाशिकमधील काळाराम मंदिराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी आठवडा भरापासुन विविध धार्मिक उपक्रमांचि रेलचेल आहे. ;

राम मंदिर भुमीपुजनाच्या पूर्वसंध्येला महिलांनी काळाराम मंदिरात दिपोत्सव साजरा केला. रामाची महाआरती करुन रामरक्षा व राम भक्तिगिते गायली. यावेळी मंदिराचा परिसर राममय झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com