दिंडोरीनामा: तांबडे - पाटील पुन्हा एकत्र; मनोमिलन की संघर्ष?

दिंडोरीनामा: तांबडे - पाटील पुन्हा एकत्र; मनोमिलन की संघर्ष?

दिंडोरी । संदीप गुंजाळ | Dindori

सध्या महाराष्ट्रात (maharashtra) विशेषतः ठाकरे आणि शिंदे गटात चालू असणार्‍या घडामोडी चर्चेच्या ठरत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये (nashik district) देखील ठाकरे गटाला (Thackeray group) सुरूंग लावून शिंदे गट (Shinde group) आपले प्रस्थ वाढवण्यासाठी मोठ्या घडामोडी करत आहेत.

दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी (Dindori Lok Sabha Liaison Chief Bhau Chaudhary) यांना शिंदे गटात सामील केल्यानंतर त्यांच्यासोबतच ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात तत्काळ केलेला प्रवेश चर्चेचा ठरला. जिल्हाप्रमुख मुळचे दिंडोरीचे (dindori) असल्याने त्यांच्या जाण्याने दिंडोरी तालुक्यातील ठाकरे गटाला कितपत फरक पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील पाटील यांची शिवसेनेच्या (shiv sena) जिल्हाप्रमुखपदी (District Chief) निवड करतांना तत्कालीन जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यावर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया काही शिवसैनिकांनी व्यक्त केली होती.

प्रामाणिक काम केले असतांनाच भाऊलाल तांबडे यांना पदावरून दूर करण्यात संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते. यामुळे भाऊलाल तांबडे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत ते जिल्हाप्रमुख म्हणून नेतृत्व करत आहेत. स्वतःची ताकद व संगठन कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध झाल्याने त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

अन्याय झाल्याची खंत व्यक्त करत कधीकाळी ज्यांच्यावर रोष व्यक्त केला गेला तेच आज शिंदे गटात दाखल झाल्याने शिंदे गटाला जिल्ह्यात भरारी घेत असतांनाच पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागते की काय? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ठाकरे गटाचे (Thackeray group) जिल्हाप्रमुख सुनील पाटील शिंदे गटात दाखल झाल्याने भाऊलाल तांबडे व सुनील पाटील पुन्हा एका पक्षात दिसणार आहे. पक्षांतर्गत काम करतांना त्यांच्यामध्ये मनोमिलन बघावयास मिळेल की अंतर्गत गटबाजीचे दर्शन होईल ही तर येणारी वेळच सांगू शकेल. एकीकडे आक्रमकपणा तर दुसरीकडे संयमीपणा असल्याने याचे मिलन होणार का? यावर चर्चा होतांना दिसत आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाची निर्मिती झाली. ठाकरे गटातुन शिंदे गटात जातांना हिंदूत्व, विकास, वैचारिक क्रांती यांसारखी अनेक कारणे बोलली जात असली तरीही शिवसेनेत असतांना पक्षातील स्थानिक अंतर्गत गटबाजी व नाराजी हे प्रमुख कारण आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचे प्रमुख उदाहरण घेतले तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांचे घेता येईल. पक्षाच्या वाढीसाठी तळमळीने काम करत शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ नक्कीच चर्चेचा आहे.

शिंदेसाहेबांवर त्यांचे प्रेम असेलही परंतु जिल्हा प्रमुख म्हणून मी पक्ष कसा वाढवू शकतो आणि माझे संघटन कौशल्य काय आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला हे देखील लपून राहिलेले नाही. शिंदे गटात सुरू असलेली इनकमिंग याची साक्ष देतेच. लवकरच होत असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे अस्तित्व प्रबळपणे दाखवून देण्याची जिद्द असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असून त्यादृष्टीने कामकाजाला सुरुवात केली आहे.

यातच तत्कालीन संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनीच भाऊलाल तांबडे यांना पदावरून दूर करत आपले स्नेही सुनील पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड केली म्हणून चर्चा आहे. यावरून भाऊलाल तांबडे यांचेही नाराजी लपून राहिलेली नाही हे देखील तितकेच खरे. परंतु सध्या त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी घेत जोमाने कामाला सुरुवात केली आणि शिंदे गटात भाऊ चौधरी आणि सुनील पाटील यांचाही प्रवेश झाला. सुनील पाटील हे शांत व संयमी नेतृत्व आहे. संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्या बरोबर त्यांचा झालेला प्रवेश आश्चर्य करणारा होता.

पक्ष प्रवेश करतांना त्यांनी जरा घाईच केली असे देखील मत व्यक्त केले जात आहे. या प्रवेशावर भाऊलाल तांबडे पक्षात येणार्‍या लोकांचे मुखाने स्वागत करून आनंद झाल्याचे बोलून दाखवत असतील परंतु मनाने त्यांना खरच आनंद झाला का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरितच आहे. कारण शाब्दिक स्वागत केलेही असेल परंतु शिंदे गटात सामील झाल्यानंतर स्वतः उपस्थित राहून स्वागत केल्याचा साधा फोटो आला नाही तसेच दिंडोरीत सुनील पाटील यांचे स्वागत होता़ंना भाऊलाल तांबडे यांच्या समर्थकांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते. ज्यांच्यावर नाराज होवून पक्षातुन बाहेर जाण्यापर्यंतचा निर्णय भाऊलाल तांबडे यांना घ्यावा लागला आता पुन्हा त्यांच्या बरोबर काम करत असतांना एकदिलाने काम करतील का ? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

माजी आमदार शिंदे गटाच्या दिशेने ?

सुनील पाटील हे शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून चर्चेत आहेत. संगठन कौशल्य असल्याने पक्ष वाढीसाठी त्यांची मदत होवू शकते हे नाकारून चालणार नाही. वर्षानुवर्षे ज्या पक्षाच्या विरोधात दंड थोपटले आणि निवडणुकांना सामोरे गेलो त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लावून आता निवडणुकीत सामोरे कसे जायचे? असा प्रश्न उपस्थित करून शिवसैनिकांच्या भावना जाणून घेवूनच आपण शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे मत व्यक्त केले आहे. आगामी काळात बाळासाहेबांच्या शिवसेनेला उभारी देण्याचा निश्चय त्यांनी केला असला तरीही पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच नागपुरच्या अधिवेशनात दिंडोरी तालुक्यातुन मोठी इनकमिंग शिंदे गटात होणार असून त्यात एका माजी आमदारांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या प्रवेशाची उत्सुकता सर्वांनाच लागली असली तरी श्रेयवादाची लढाई होवू नये म्हणजे झाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com