दिंंडोरीनामा : जोंधळेच्या सोडचिठ्ठीने राजकिय उलथापालथ

दिंंडोरीनामा : जोंधळेच्या सोडचिठ्ठीने राजकिय उलथापालथ

जानोरी । संदीप गुंजाळ | Janori

सध्या निवडणुकीचे (election) वारे वहायला लागले आहे. गुलाबी थंडीत निवडणुकीच्या गरमागरम गप्पा ऐकायला मिळत आहे. लवकरच जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या (panchayat samiti) निवडणुकांचा बार वाजला जाणार असल्याने इच्छुकांची नजर आरक्षणावर (Reservation) पडली असतांनाच इच्छुक पुर्ण तयारीनिशी मतदारांचा (voters) कौल घेत आहे.

मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेतून (shiv sena) नाराज झालेले तुकाराम जोंधळे यांनी भाजपमध्ये (bjp) प्रवेश करून आपल्या सौभाग्यवतीला जिल्हा परिषदेची उमेदवारी घेऊन जोरदार टक्कर दिली असतांनाच नुकतेच त्यांनी भाजपला रामराम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. ते कोणत्या पक्षात उमेदवारी करणार? यावर चर्चा जोरदार सुरू असून प्रमुख पक्षांनी जोंधळेला आपल्या पक्षात येण्यासाठी गळ घातले असले तरी

ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे, असे असले तरी भाजपला मात्र याचा फटका बसेल यात शंका नाही. यामागील कारण शोधून विशेषतः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Health Minister Dr. Bharti Pawar) यांनी यांचा शोध घेत कर्तव्य शुन्य स्वयंभु नेत्यांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी देण्यासाठी तुकाराम जोंधळे हे इच्छूक होते. परंतु शिवसेनेकडून त्यांना डावलल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी लढवली. मोहाडी (mohadi) गटात भाजपचे मतदारांची संख्या जेमतेमच. परंतु तुकाराम जोंधळे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपचे वारे जोरदार वाहिले.

मोहाडी गटात शिवसेना व राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष मानले जात असतांना जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जोरदार टक्कर देत क्रमांक दोनची मते मिळवली. भाजपच्या उमेदवारांचा पराभव होऊनही तो एक चर्चेचा विषय ठरला होता. पराभव होऊनही निराश न होता गटातील गावातील कार्यकर्त्यांच्या सहवासात राहून तुकाराम जोंधळे यांनी स्वतः ची ताकद निर्माण केली.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ भारतीताई पवार यांना मोहाडी गटातुन आघाडी मिळवून देण्यासाठी तुकाराम जोंधळे यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. नव्याने पक्षात पदार्पण केलेल्या तुकाराम जोंधळेंचे कार्य सर्वसमावेशक असल्याने पक्षातही त्यांची चर्चा झाली. सध्या पुन्हा नव्याने जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने मोहाडी गटातील काही कर्तव्य शुन्य असलेल्या स्वयंभु नेत्यांना जिल्हा परिषदेचे स्वप्न पडल्याने तुकाराम जोंधळे यांच्या विरोधात गटातील काही स्वयंभू नेत्यांनी सुरू केलेली धुसफूस त्यांच्या जिव्हारी लागली

आणि त्यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपला रामराम केल्याची बातमी कळताच तुकाराम जोंधळे यांनी पुन्हा स्वगृही अर्थात शिवसेनेत यावे अशी इच्छा शिवसैनिक तसेच पक्षश्रेष्ठी व्यक्त करत असून राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षानेही त्यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी व शिवसेना हे दोनच पक्ष मोहाडी गटात प्रमुख मानले जात असल्याने तुकाराम जोंधळे हे कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसे असले तरी तुकाराम जोंधळे यांनी भाजपमधुन बाहेर निघण्याच्या निर्णयामुळे भाजपची या गटात गोची होणार हे नक्की. कारण तुकाराम जोंधळे यांच्या पक्षप्रवेशानंतरच गटामध्ये भाजपची या गटात ताकद वाढली होती. परंतु काही कर्तव्य शुन्य स्वयंभु नेत्यांच्या आकसापोटी पक्षाचे नुकसान होणार हे मात्र निश्चित.

त्याचा फटका मात्र पुढील लोकसभेच्या निवडणुकीत डॉ भारतीताई पवार यांना तर बसणार नाही ना? याकडे लक्ष देवून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ .भारतीताई पवार यांनी याकडे विशेष लक्ष देवून कर्तव्यशुन्य स्वयंभु नेत्यांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाही तर असेच एक एक महत्त्वाचे शिलेदार पक्षातून नाराज होवून इतरत्र आपले बस्तान बसविले तर पक्षाबरोबरच त्यांना वयक्तिक फटका बसण्यास सुरुवात होईल हेही तितकेच सत्य आहे.

तुकाराम जोंधळे यांना जिल्हा परिषद सदस्य होण्याचा ध्यास असल्याने त्यांना शिवसेनेतून परत येण्यासाठी गळ घातला जात असला तरी शिवसेनेत असलेले मोहाडी गटाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद गटनेते प्रविणनाना जाधव हे आहेत. त्यांना डावलून तुकाराम जोंधळेना उमेदवारी देणे हे पक्षाला न परवडणारे असल्याने तुकाराम जोंधळे यांना शिवसेनेकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकाधिक कल देत असल्याचे बोलले जात आहे.

कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीत तुकाराम जोंधळेंना उमेदवारी देण्याबाबत सहमती दर्शवली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटातील नेते शहाजीदादा सोमवंशी व शंकरराव काठे यांनी तसे उघडपणे जाहिर मतही प्रकट केले आहे.त्यामुळेच ते सध्या वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीतच मोहाडी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रविणनाना जाधव व तुकाराम जोंधळे यांची चुरसच बघायला मिळणार हे आजचं निश्चित झाले असले तरीही भाजपला मात्र चिंतनाची गरज असुन चुकीच्या स्वयंघोषित नेत्यांना आवर घालणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्न होतात का? याकडे बघणं महत्त्वाचं ठरेल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com