दिंडोरीनामा: इच्छुकाचे आरक्षण सोडतीकडे लक्ष

दिंडोरीनामा: इच्छुकाचे आरक्षण सोडतीकडे लक्ष

दिंडोरी | संंदीप गुंजाळ | Dindori

जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti) व ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणूकांना (election) ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) ब्रेक बसलेला होता.

नुकताच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वाच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्य करुन ओबीसी आरक्षणानुसारच निवडणूकां घेण्याच्या सूचना केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता लागलेला ब्रेक निघुन निवडणूकींचा (election) मार्ग मोकळा होईल, या अपेक्षेने इच्छुकांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (Local Self-Government) निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन लांबणीवर पडल्या होत्या. मागील आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे आरक्षण जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.आरक्षण काय पडेल, याची उत्सुकता असणार्‍या इच्छुकांचा मात्र यावेळी हिरमोड झाला. एकदाचे आरक्षणाचा तिढा सुटवा व निवडणूकीचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. अखेर ओबीसी आरक्षणाचा (reservation) विषय मार्गी लागला असून आता इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहे

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) एकुण सात गट व चौदा गणाची निवडणूक (election) पार पडणार आहे. यंदा बहुतेक गटात खुल्या वर्गाला संधी मिळणार असल्याचे भाकीत केले जात असून दिंग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागतांना दिसत आहे. गट व गणामधील आरक्षण सोडतीनंतर खर्‍या कसोटीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोणत्या गटात व गणात कुठले आरक्षण पडणार याकडे इच्छुक नजर लावून बसले आहे. सोशल मिडीयावर (social media) आरोप - प्रत्यारोपांच्या फैर्‍या सुरु झाले असून आपआपल्या पक्षाची बाजू मांडतांना कार्यकर्ते शाब्दिक युध्द करतांना बघावयास मिळत आहे.

यंदाची निवडणूक ही अंत्यत चुरशीचीच होणार याचे संंकेत यानिमित्ताने बघावयास मिळत आहे. राष्ट्रवादी (Nationalist Congress), शिवसेना (shiv sena), काँग्रेस (congress), भाजप (BJP), माकप, रिपाइं, मनसे, बहुजन विकास आघाडी आदी पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. मागील निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress) विजयी घोडदौड रोखण्यासाठी शिवसेना व चारोस्कर गटाला यश आले होते. यंदा चारोस्करांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदा सर्व गटावर शिवसेनेचीच सत्ता राहणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) देखील यंदा कंबर कसली असून येणारी विधानसभा निवडणूकीत (assembly elections) सत्तेची गणित सुलभ करण्यासाठी प्रत्येक गटावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहण्यासाठी मोर्चेबांधणीस तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस, भाजप व माकपला तालुक्यामध्ये स्वत: चा मतदार तयार करुन तालुक्यात अस्तित्व वाढवण्याची आवश्यकता असल्याने त्या दृष्टीने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या पक्षाबरोबरच प्रत्येक गटामध्ये प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराज इच्छुकांवर देखील करडी नजर राहणार आहे.

या निमित्ताने नाराज गट तयार होवून तो गट शिंदे गट म्हणून तर चर्चिले जाणार नाही ना ? यावर देखील तर्कविर्तक लढवतांना दिसत आहे. गणापेक्षा गटाकडे इच्छुकांची संख्या लक्षवेधी असून मात्तबरांनी यावेळी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणूकीत कुणावर गुलाल पडणार आणि कुणाची बत्ती गुल होणार याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

येणार्‍या विधानसभेत आपल्याच पक्षाचा आमदार असावा, या अपेक्षेतून प्रत्येक पक्षाने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यात कितपत यशस्वी होतील, ही येणारी वेळच सांगेल. 7 गटापैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर पक्षाचे अस्तित्व सिध्द होणार असल्याने पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते जीवाची बाजी लावणार हे आजच्या घडामोडींवरुन सिध्द होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com