पालखेड धरणातून विसर्ग वाढवला; पुणेगाव मधूनही होतोय 'इतका' विसर्ग;

पालखेड धरणातून विसर्ग वाढवला; पुणेगाव मधूनही होतोय 'इतका' विसर्ग;

ओझे l वार्ताहर oze

दिंडोरी तालुक्यात सलग चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. सर्वत्र पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. भिज पाऊस पडत असल्यामुळे जमिनीची संपूर्ण शांतता होऊन पाण्याचा थेंब थेंब वाहत असल्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठ सावधानतेचा इशारा दिला आहे...

दिंडोरी तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर येत असल्यामुळे तालुक्यातील धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी ९ वाजता पालखेड धरणातून २०७७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला असून मांजरपाडा( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव ६९.८२% भरले असून पुणेगाव धरणातून आज सकाळी ७ वाजता ४००० क्युसेक्स पाणी उनंदा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

यामुळे ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ३८.५०% इतका वाढला आहे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरण ४४.२२% इतके भरले आहे तर वाघाड धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे वाघाड धरण ५४. ४७% इतके भारले आहे.

असून तिसगाव धरणामध्ये पूरपाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यात नॉनस्टॉप जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुढील काही तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिंडोरी तालुक्यात आज पडलेला पाऊस

दिंडोरी 71.00 mm

रामशेज. 98.00 mm

ननाशी. 186.00 mm

उमराळे 99.00 mm

लखमापूर 86.00 mm

कोशिंबे 171.00 mm

मोहाडी 52.00 mm

वरखेडा 98.00 mm

वणी 101.00 mm

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वेगाने वाढल्यामुळे सकाळी ९:०० वा पालखेड धरणातून विसर्ग वाढवून २०७७० क्युसेक्स विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल तरी नदीपात्रा परिसरातील जनतेने पूराची विशेष काळजी घ्यावी

सुदर्शन सानप शाखा अभियंता पालखेड धरण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com