कत्तलीसाठी आणलेल्या १२ गायींची सुटका

कत्तलीसाठी आणलेल्या १२ गायींची सुटका

जानोरी | Janori

सोमवारच्या घटनेनंतर पुन्हा गायीची वाहतूक (Transportation of cows) करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करत जनावरांची सुटका केली आहे.

दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) सोमवारी कत्तलीसाठी नेत असलेल्या गायींची सुटका करीत धडक कारवाई केली होती. त्याचप्रमाणे आजही कत्तलीसाठी आणलेल्या १२ गायींची सुटका करीत संबंधितांवर कारवाई (Action बी Dindori Police) केली आहे.

दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली आहे.

दरम्यान दिंडोरी पोलीस हे गस्तीवर असताना ननाशी (Nanashi Village) येथे आले. त्यावेळी त्यांना गोवंश जातीची जनावरे (गाय, बैल, गो-हे) हे पावसात बांधलेली दिसून आले. नमुद जनावरांबाबत आजुबाजुस विचारपुस केली असता ही जनावरे विक्री करता ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.

सदर जनावरे ही गुलाब रामचंद्र वाघमारे यांची असल्याचे निदर्शनास आले. त्यात १० गायी, १ बैल व एक गोर्‍हा अशी एकूण १२ गोवंश जातीची जनावरे आढळून आली. याबाबत सविस्तर चौकशी करून पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी तात्काळ हद्दीतील पेठ पोलिस स्टेशनला (Peth Police Station) याबाबत माहिती कळविली.

माहिती मिळताच संबंधित पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गाडे हे घटनास्थळी पोहचले. चौकशी केली असता जनावरांचे कुणीही मालक आढळून न आल्याने जनावरांच्या स्वास्थ सबंधाने नंदिनी गोशाळा उमराळे ता. दिंडोरी येथे जमा करण्यात आलेले आहेत.

संबंधित इसम गुलाब रामचंद्र वाघमारे (रा.ननाशी) याविरुद्ध गुन्हा केल्याची कायदेशीर फिर्याद पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरीक्षक विजय उशिरे यांसह पेठ पोलिस करीत आहेत.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कुठेही असा अनुचित प्रकार होत असेल तर संबंधित पोलिस ठाण्याशी नागरिकांनी संपर्क करावे असे आवाहन या निमित्ताने करतो.

- कल्पेशकुमार चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, दिंडोरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com