दिंडोरी : वनारवाडीत शंभर टक्के लसीकरण

दिंडोरी : वनारवाडीत शंभर टक्के लसीकरण

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण Corona Vaccination मोहिमेला वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील अठरा वर्षावरील नागरिकांचे 100 % लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. 100% लसीकरण झालेले वनारवाडी Vanarvadi हे दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka पहिले गाव ठरले आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या रणतळे लगतच असलेल्या वनारवाडी हे गाव तालुका मुख्यालयाच्या लगतचे गाव आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून अठरा वर्षावरील सर्व ग्रामस्थांना पहिला डोस अर्थात करोनाची लस देण्यात आली आहे. पहिल्या लाटेत शुन्य तर दुसर्‍या लाटेत कोवीड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगण्य होती.

विशेष म्हणजे या गावात एकही करोना बाधित दगावलेला नाही. करोनामुक्त असलेले हे गाव आता अठरा वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस मिळालेले गाव ठरले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार शीतल जगताप, अनिता कदम, सुनील महाले. एस. पी. कुलकर्णी यांनी कॅम्प राबविले.

वशेष अभियान राबवून अठरा वर्षावरील सर्वांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले. लसीकरणकामी वनारवाडी गावाच्या आशासेविका सुनीता बच्छाव यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच दत्तात्रय भेरे, ग्रामसविका अश्विनी पाटील, मुख्याध्यापक भाऊसाहेब नांदुरकर, शिक्षक विलास जगदाडे, सुनंदा घोलप, सुनंदा आहिरे, अंगणवाडी सेविका ललिता देशमुख, मदतनीस लीलाबाई गुंबाडे आदींनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com