दिंडोरी नगरपंचायतीत चारोस्करांचेच वर्चस्व

दिंडोरी नगरपंचायत
दिंडोरी नगरपंचायत

दिंडोरी | संदिप गुंजाळ | Dindori

दिंडोरी (dindori) नगरपंचायतीत (nagar panchayat) नगराध्यक्ष (city president) कुणाचा? यावर गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असुन

दिंडोरीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आकार घेत सत्ता स्थापन केली असली तरीही यासर्व प्रक्रियेत माजी आमदार रामदास चारोस्कर (MLA Ramdas Charoskar) यांचीच भुमिका महत्वाची ठरली आहे. यामुळे दिंडोरी नगरपंचायतीत चारोस्करांचेच वर्चस्व राहणार असून ते पुन्हा एकदा किंगमेकरच आहे हे सिद्ध झाले.

दिंडोरी नगरपंचायतीत एकुण 17 जागेसाठी निवडणूक (election) प्रक्रिया पार पडली. यात शिवसेना (shiv sena) 6, राष्ट्रवादी (rashtravadi) 5, भाजप (bjp) 4 तर राष्ट्रीय काँग्रेसने (congress) 2 जागा मिळविल्या. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करण्यासाठी प्रयत्न केला गेला, परंतु अंतर्गत कलहाने ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करून शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसने युती केली.

यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर (Former MLA Ramdas Charoskar) व काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी जोरदार मोट बांधली. राष्ट्रवादी एकटी यावेळी नगरपंचायतीच्या रणांगणात उतरली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा धुरा सांभाळत अविनाश जाधव यांनी सहकार्यांसह जोरदार टक्कर दिली. भाजपने नाराज इच्छुकांना आपल्या सोबत घेऊन निवडणूकीत (election) रंगत आणली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीनंतर लागलेल्या निकालात शिवसेना 6 व राष्ट्रीय काँग्रेस 2 असे एकूण 8 उमेदवार निवडून आले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले. शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांचे 8 नगरसेवक निवडून आले खरे परंतु सत्तास्थापनेसाठी 9 चा जादुई आकडा पार पाडणे आवश्यक असल्याने ते राष्ट्रवादी बरोबर असलेल्या अंतर्गत कलहामुळे एकत्र येवूच शकत नसल्याचा अंदाज लावत भाजपला किंगमेकर ठरविले गेले. यामुळे भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला गेला. त्यातच नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित निघाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने नगराध्यक्ष शिवसेनेचा की भाजपचा होणार? यावर तर्कवितर्क लढवले गेले.

यावेळी भाजपने (bjp) नगराध्यक्षपदावर आपला दावा केला. यासाठी शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) या दोन्ही बाजुच्या नेत्यांशी संपर्क साधून कोणाकडून जास्त पदरात पाडून घेतले जाईल याची चाचपणी भाजपच्या वरिष्ठांकडून करण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसकडे सर्वाधिक 8 नगरसेवक (Corporator) असून 3 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतांना भाजपचा नगराध्यक्ष होणारच कसा? असा सवाल माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केला. काहीही झाले तरी शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल असा निश्चय मनात बाळगून त्यांनी आपली राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली.

यावेळी भाजपाशीही बोलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु भाजपने नगराध्यक्षपदाबरोबर काही वर्ष उपनगराध्यक्ष व पाच वर्षे स्वीकृत सदस्य देण्याचा प्रस्ताव आला असल्याची चर्चा आहे. हाच प्रस्ताव भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला देखील देण्यात आला.

एकीकडे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रतिष्ठेचा आणि दुसरीकडे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतांना भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणे हे नक्कीच दोन्ही श्रेष्ठींना मान्य होणारच नव्हते हे तितकेच खरे. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचाच लाभ होणार याची प्रचिती शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना झाली. आणि मतभेद विसरून एकत्र यावेच लागेल, यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी देखील विशेष प्रयत्न केले.

महाविकास आघाडी एकत्र येऊन भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन होत असल्याची बातमी भाजपला कळताच त्यांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. विरोधी पक्ष असतांना सत्तेत सहभागी होण्याची संधी आली असतांनाच भाजपच्या वाढीव अपेक्षेमुळे गमावली हे देखील तितकेच सत्य मानावे लागेल. भाजपच्या गटनेत्या अरूणा देशमुख यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या सर्व अटी मान्य करून देखील

त्यांनी भाजपला सोबत घेण्याचे टाळले यावर जाहीर नाराजी व्यक्त करत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप तथस्थ भुमिका बजावेल व पुढील काळात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत न्याय देवू अशी भूमिका जाहीर केली. त्यावर नगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होणार याचा अंदाज लावला गेला. परंतु शेवटच्या क्षणी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरून अचानक घुमजाव केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

भाजपने जाहीर केलेल्या घुमजाववर बोलतांना काही लोक भाजपमध्ये फुट पडल्याचे बोलत असल्याने आम्ही चारही नगरसेवक एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी आम्ही अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया गटनेत्या अरूणा देशमुख यांनी व्यक्त केली. परंतु सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव होवून काहीतरी चमत्कार घडेल अशी अपेक्षा भाजपला होती की काय? हा संशोधनाचा विषय आहे.

जर चमत्काराची अपेक्षा ठेवलीच असेल तर ती अपेक्षा फोलच ठरली असेच म्हणावे लागेल. अखेर शिवसेनेचे नेतृत्व करणारे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या मनाप्रमाणे शिवसेनेच्या मेघा धिंदळे या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायतीत सत्तेत सहभागी होणारच याचा जणुकाही विडाच उचलून कमालीची जुळवाजुळव करणारे गटनेते अविनाश जाधव हे देखील उपनगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले. या सर्व प्रक्रियेत अति तिथे माती... याचा प्रत्यय आला. अति अपेक्षा ठेवली तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जावू शकतो याची प्रत्यक्ष अनुभुती दिंडोरीकरांना मिळाली.

विकासाचा दृष्टीकोन

दिंडोरी नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी माजी आमदार रामदास चारोस्करांचीच भुमिका महत्वाची ठरली. विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या कोणत्याही भुमिकेवर तात्काळ प्रतिक्रिया न देता शांत आणि संयमाने नगरपंचायतीची सत्ता काबीज केली.

मागील निवडणुकीत चारोस्करांवर विश्वास टाकत सर्वाधिक जागा त्यांना दिंडोरीकरांनी दिल्या होत्या. त्यावेळी दिंडोरीकरांसाठी महत्वाचा असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावत ओझरखेडहून जलवाहिनी केली. त्याचबरोबर प्रत्येक वार्डात विकासकामे करत दिंडोरीकरांची मने जिंकली.

त्याचा प्रत्यय म्हणून या निवडणुकीत चारोस्करांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक 8 जागा दिंडोरी वासियांनी दिल्या. दिंडोरीकरांनी टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवणे महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने दिंडोरीत देखील महाविकास आघाडी स्थापन करून दिंडोरीचा विकास करून घेण्याचा संकल्प चारोस्करांनी केला आहे.

दिंडोरी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मेघा धिंदळे तसेच उपनगराध्यक्ष अविनाश जाधव हे उच्च शिक्षित आहे. उच्च शिक्षित पदाधिकार्‍यांची निवड करुन दिंडोरीचा कायापालाट करण्याचा चारोस्करांचा दृष्टीकोन दिंडोरीवासियांना नक्कीच आवडला. विकास हाच दृष्टीकोन समोर ठेऊन चारोस्करांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com