
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी नगरपंचायत निवडणूक (Dindori Nagarpanchayat Election) येत्या दि.21 डिसेंबर रोजी होत असून एकूण 14 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात असून एकूण 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे. 2 प्रभाग इतर मागासवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर निवडणुकीला स्थगिती आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे सुजित त्र्यंबक मुरकुटे हे बिनविरोध निवडून आले आहे. काल उमेद्वारांना चिन्हे वाटप करण्यात आले.
असे आहे उमेदवार
प्रभाग क्र. 1 - रोहिणी भगवान गायकवाड (कमळ), मीराबाई नारायण पारखे (नारळ), रत्नाबाई सुभाष बोरस्ते (धनुष्यबाण), निर्मला कैलास मवाळ (घड्याळ), मेघा केशवराव शिंदे (रोडरोलर).
प्रभाग क्र. 2 - अविनाश बाबुराव जाधव (घड्याळ), रचना विक्रमसिंह राजे (कमळ), निलेश भाऊसाहेब शिंदे (ट्रॅक्टर).
प्रभाग क्र. 3 - कल्पना संतोष गांगोडे (धनुष्यबाण), जिजा शांताराम चारोस्कर (घड्याळ), राणी रवी भोई (कमळ).
प्रभाग क्र. 4 - सचिन बंडू पवार (घड्याळ), अक्षय वसंत बदादे (कमळ), सुनीता रमेश लहांगे (धनुष्यबाण).
प्रभाग क्र. 5 - नरेश भास्करराव देशमुख (घड्याळ), प्रदीप श्रीकांत देशमुख (धनुष्यबाण), प्रितम प्रकाशराव देशमुख (कपबशी).
प्रभाग क्र. 6 - अरुणा रणजित देशमुख (कमळ), सुनीता अण्णासाहेब बोरस्ते (घड्याळ), कमल दत्तू शिंदे (नारळ).
प्रभाग क्र. 7 - राजश्री सतीश देशमुख (धनुष्यबान), संगीता प्रमोद देशमुख (कमळ), लता रमेश बोरस्ते (घड्याळ).
प्रभाग क्र. 8 - शैला सुनील उफाडे (हात), वैशाली विनोद चवण (बॅट).
प्रभाग क्र. 9 - निकीता प्रीतम कांबळे (घड्याळ), मेघा नितीन धिदळे (धनुष्यबाण), जयश्री एकनाथ हिंडे (कमळ).
प्रभाग क्र. 10 - जयेश शाम गवारे (हात), नितीन मधुकर गांगुर्डे (कमळ), लता दशरथ निकम (घड्याळ).
प्रभाग क्र. 12-आशा भास्करराव कराटे (कमळ), तुषार रामदास चारोस्कर (गॅस सिलेंडर), धनराज सुनील भवर (घड्याळ).
प्रभाग क्र. 13 - ज्योती सचिनराव देशमुख (धनुष्यबान), शुभांगी अमोल मवाळ (रेल्वे इंजिन).
प्रभाग क्र. 14 - अक्षय अशोक चारोस्कर (दूरध्वनी), दिपक भास्कर जाधव (घड्याळ), प्रशांत भालचंद्र मोगल (धनुष्यबाण).
प्रभाग क्र. 15 - सुनिता सुनील अस्वले (रेल्वे इंजिन), प्रज्ञा तुषार वाघमारे (कमळ), नंदिनी अनिल साठे (घड्याळ).
11 उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण 17 जागांपैकी 14 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक 11 व 16 इतर मागासवर्गसाठी राखीव असल्याने या जागेवरील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे.
प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे उमेदवार सुजित मुरकुटे हे बिनविरोध निवडून आले आहे. एकूण 11 उमेदवारांपैकी माघार घेणारे शिवसेनेचे (Shivsena) दोन, भाजपचे (BJP) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एक व अपक्ष सहा उमेदवार आहे. यावरून दिंडोरी (Dindori) शहरात कोणी कोणासाठी माघार घेतली आहे. कोणाची कोणाबरोबर पक्षविरहित गट्टी जमली आहे हे येणार्या निवडणुकीत दिसणार आहे.