दिंडोरी बाजार समिती निवडणूक : पक्षविरहित पॅनल निर्मित्ती; 18 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात

दिंडोरी बाजार समिती निवडणूक : पक्षविरहित पॅनल निर्मित्ती; 18 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत (Dindori APMC Election) एकूण 18 जागांसाठी 42 उमेदवारांनी उमेदवारीचा निश्‍चय केला असून 107 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत...

या निवडणूकीत दोन पॅनलची निर्मित्ती झाली असून दोन्ही पॅनलमध्ये सर्व पक्षीय उमेदवार असल्याने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढण्याचा निश्‍चय दोन्ही पॅनलच्या नेतृत्वानी घेतला आहे. त्यामुळे या निवडणूकीमध्ये रंगत वाढणार असल्याचे चिन्हे दिसून आली आहे.

दिंडोरी बाजार समितीच्या निवडणूकीसाठी छाननी अंती 149 उमेद्वारी अर्ज शिल्लक राहिलेले होते. माघारीच्या अंतीम दिवशी एकूण 107 उमेद्वारांनी माघारी घेतली. एकूण 18 जागासाठी 42 उमेद्वारांनी उमेद्वारी करत आपले नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी विद्यमान सभापती दत्तात्रय पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनल निर्मित्ती झाली तर माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, नरेंद्र जाधव, विलास कड, शहाजी सोमवंशी, प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मित्ती झाली आहे.

दिंडोरी बाजार समिती निवडणूक : पक्षविरहित पॅनल निर्मित्ती; 18 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात
नाशिक कृउबा निवडणूक : पिंगळेंच्या नेतृत्त्वाखाली पॅनल जाहीर; 'हे' आहेत उमेदवार

पॅनलची निर्मित्ती होत असतांना दोन्ही पॅनलमध्ये सर्व पक्षीय उमेद्वारांचा समावेश असल्याने या निवडणूकीत पक्षीय हेवेदावे बाजूला ठेऊन विचाराने एकत्र येवून या निवडणूकीचे रणशिंग फुंकले असल्याचे मत व्यक्त होत आहे. शेतकरी उत्कर्ष पॅनलच्या वतीने केलेल्या विकासावर मतदारांपर्यंत पोहचत मते मागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

त्याचबरोबर परिवर्तन पॅनलच्या वतीनेही वैयक्तिक टिकाटिपणी करण्यापेक्षा संधी दिल्यास त्याचे सोने करुन बाजार समितीचा विकास करुन दाखवण्याचा विश्‍वास मतदारांना व्यक्त करण्याचे आवाहन पॅनल नेतृत्वांनी केले आहे. त्यामुळे या निवडणूकीच्या प्रचारात कोणते पॅनल व कोणता मुद्दा घेऊन प्रचार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची तटस्थ भूमिका

काँग्रेसला विचारात घेऊन सत्ताधारी पॅनलने पॅनलची निर्मित्ती केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी उमेद्वारी अर्ज माघार घेत काँग्रेस या निवडणूकीत तथस्त भुमिका घेत असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पक्षाशी भुमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे मत सुनील आव्हाड, वाळू जगताप यांच्या उपस्थितीत प्रकाश पिंगळ यांनी भुमिका व्यक्त केली. परंतू दिंडोरी शहराध्यक्ष गुलाब जाधव यांच्या पत्नी विमल जाधव यांनी शेतकरी उत्कर्ष पॅनलकडून उमेद्वारी करीत असल्याने काँग्रेसची आगामी भुमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिंडोरी बाजार समिती निवडणूक : पक्षविरहित पॅनल निर्मित्ती; 18 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात
पिंपळगांव बाजार समिती निवडणूक : दोन पॅनलमध्ये लढत

शेतकरी उत्कर्ष पॅनल

अ: क्र. उमेदवारांचे नाव - मतदार संघ

1 दत्तात्रय रामचंद्र पाटील सहकारी संस्था (सर्वसाधारण)

2 चंद्रशेखर हिमंतराव देशमुख सहकारी संस्था (सर्वसाधारण)

3 शिवाजी बाबुराव पिंगळ सहकारी संस्था (सर्वसाधारण)

4 अनिल सुदामराव देशमुख सहकारी संस्था (सर्वसाधारण)

5 रघुनाथ राजाराम मोरे सहकारी संस्था (सर्वसाधारण)

6 विलास दिनकर निरघुडे सहकारी संस्था (सर्वसाधारण)

7 प्रवीण चंद्रभान संधान सहकारी संस्था (सर्वसाधारण)

8 प्रवीण एकनाथ जाधव सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)

9 शाम गणपत बोडके सहकारी संस्था (वि. जा. भ. ज.)

10 सत्यभामा साहेबराव हिरे सहकारी संस्था (महिला राखीव)

11 विमल गुलाब जाधव सहकारी संस्था (महिला राखीव)

12 वसंत रामभाऊ जाधव ग्रामपंचायत (सर्वसाधारण)

13 नरेंद्र सुभाष पेलमहाले ग्रामपंचायत (सर्वसाधारण)

14 पांडूरंग काळू टोंगारे ग्रामपंचायत (अनु. जा. जमाती)

15 पंडीत महादू बागूल ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल)

16 सुधाकर प्रभाकर जाधव हमाल तोलारी संघ

परिवर्तन पॅनल

अ: क्र. उमेदवारांचे नाव मतदार संघ

1 प्रशांत प्रकाश कड सहकारी संस्था (सर्वसाधारण)

2 कैलास बाबुराव मवाळ सहकारी संस्था (सर्वसाधारण)

3 गंगाधर खंडेराव निखाडे सहकारी संस्था (सर्वसाधारण)

4 नरेंद्र कोंडाजी जाधव सहकारी संस्था (सर्वसाधारण)

5 पांडूरंग निवृत्ती गडकरी सहकारी संस्था (सर्वसाधारण)

6 रतन रामदास बस्ते सहकारी संस्था (सर्वसाधारण)

7 बाळासाहेब विश्‍वनाथ पाटील सहकारी संस्था (सर्वसाधारण)

8 दशरथ शिवाजी उफाडे सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)

9 प्रवीण वसंत केदार सहकारी संस्था (वि. जा. भ. ज.)

10 रचना अविनाश जाधव सहकारी संस्था (महिला राखीव)

11 अर्चना अरुण अपसुंदे सहकारी संस्था (महिला राखीव)

12 योगेश माधवराव बर्डे ग्रामपंचायत (सर्वसाधारण)

13 दत्तू नामदेव भेरे ग्रामपंचायत (सर्वसाधारण)

14 दत्ता पांडूरंग शिंगाडे ग्रामपंचायत (अनु. जा. जमाती)

15 दत्तु चिंतामण राऊत ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल)

16 विजय मुरलीधर गोतरणे हमाल तोलारी संघ

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दिंडोरी बाजार समिती निवडणूक : पक्षविरहित पॅनल निर्मित्ती; 18 जागांसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात
नाशिक कृउबा निवडणूक : व्यापारी गटातून 'हे' बिनविरोध
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com