दिंडोरी : नारळाच्या झाडावर वीज कोसळली

दिंडोरी : नारळाच्या झाडावर वीज कोसळली

ओझे । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली .मान्सूनपूर्व बरसण्यापूर्वी ढगांच्या गडगडाटासह वीजही मोठ्या प्रमाणात कडाडल्या त्यामुळे अनेक ठिकाणी विजा पडणार की काय यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली तर अनेक प्रवाशांनी वाहने थांबून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी येथे दुपारच्या सुमारास प्रभाकर सदाशिव उगलेयांच्या शेतातील नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली नारळाच्या झाडावर पडलेल्या विजेमुळे हे झाड जळतांना अनेकांना दिसले दरम्यान, नारळाच्या झाडाच्या सुकलेल्या भागाने पेट घेतला होता.त्याच वेळी प्रसंगावधानराहुल राहुल उगले यांनी हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Related Stories

No stories found.