दिंडोरीतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

दिंडोरीतील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
Anti Corruption Bureau

नाशिक | Nashik

सातवा वेतन आयोगाचा (Seventh Pay Commission) फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकास (Headmaster) रंगेहाथ पकडण्यात (Arrested) आले आहे. (Anti Corruption Bureau)

राजेंद्र कळसाईत (Rajendra Kalsait) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांच्याकडे सातवा वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याचा मोबदला म्हणून सहा हजार रुपयांची मागणी कळसाईत यांनी केली. परंतु तडजोडीअंती पाच हजार देण्याचे ठरले.

यावेळी घटनेची माहिती तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवली. यानुसार सापळा रचून नाशिक पथकाने मेरी लिंक रोड (Meri Link Road) नाशिक येथील अंबिका सुपर मार्केट समोर कळसाईत यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com