दिंडोरी ग्रामपंचायत निवडणूक : भर पावसात मतदारांचा प्रतिसाद; आज निकाल

दिंडोरी ग्रामपंचायत निवडणूक : भर पावसात मतदारांचा प्रतिसाद; आज निकाल

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka )मोठ्या ग्रामपंचायती पैकी मोहाडी ग्रामपंचायतीत 6658 पैकी 5113 मतदारांनी म्हणजेच सरासरी 76 टक्के मतदानाचा हक्क बजावला. जानोरी ग्रामपंचायत च्या 5519 मतदारांपैकी 4312 मतदारांनी सरासरी 78 टक्के, मडकीजांब येथे 2218 पैकी 1961 झाले. तळेगाव दिंडोरी 92 टक्के, दहेगाव 88टक्के, वरखेडा 79टक्के. अंतिम वृत्त हाती येणे पर्यंत अनेक गावातील आकडेवारी मिळू शकलेली नाही.

काल तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उमेद्वारांना प्रचारासाठी दमछाक झाली होती. आजही पावसाने सकाळपासूनच संततधार सुरु असल्याने मतदारांना भर पावसात मतदानासाठी घेऊन येण्यासाठी धावपळ सुरु होती. उमेद्वारही स्वत: पावसात उभे राहुन मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. भर पावसातही उमेद्वारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळत होते.

50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी 304 उमेदवारांनी माघार घेतल्याने 586 उमेदवार रिंगणात होते. तालुक्यातून 173 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तसेच नऊ ग्रामपंचायतींचीही बिनविरोध निवड झाली होती. 50 ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले होते. शक्यतो ग्रा.पं. निवडणुका स्थानिक पातळीवर राजकीय पक्षविरहीत लढवल्या जात असल्या तरी कोणता गट कुठे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावागावांत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष बघावयास मिळत आहे.

यंदा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असून सरपंचाला सर्वस्व अधिकार प्राप्त झाले असल्याने त्याबाबत अतिदक्षता घेण्यात आली. ऐन पावसात मतदारांनी मतदानासाठी दिलेला कल कुणाला तारणार याची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. आज 12 वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागणार असल्याने गावगावात विजय उत्सव साजरा करण्यासाठी कार्येकर्ते सज्ज झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com