ग्रामपंचायत निवडणूक : दिंडोरी तालुक्यात 'इतक्या' उमेदवारांची बिनविरोध निवड

ग्रामपंचायत निवडणूक : दिंडोरी तालुक्यात 'इतक्या' उमेदवारांची बिनविरोध निवड

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ( Grampanchayat Elections ) माघारीच्या अंतिम दिवशी 304 उमेदवारांनी माघार घेतल्याने 586 उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातून 173 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच नऊ ग्रामपंचायतींचीही बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय पाच सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

सरपंचपदासाठी सर्वाधिक उमेदवार जुने धागूर, कोचरगाव, मुळाने, रासेगाव, पिंपळणारे हे गाव तर सदस्यांसाठी जानोरी व मोहाडी या गावांमध्ये सर्वाधित उमेदवार असल्याचे चित्र बघावयास मिळते. करोना आणि आरक्षणाच्या मुद्यावर लांबणीवर पडलेल्या दिंडोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. 50 ग्रामपंचायतींच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले. शक्यतो ग्रा.पं. निवडणुका स्थानिक पातळीवर राजकीय पक्षविरहीत लढवल्या जात असल्या तरी कोणता गट कुठे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गावागावांत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष बघावयास मिळत आहे. यंदा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असून सरपंचाला सर्वस्व अधिकार प्राप्त झाले असल्याने त्याबाबत अतिदक्षता घेतली जात आहे. आपल्याच गटातला सरपंच निवडून यावा यासाठी कमालीची जुळवाजुळव बघावयास मिळत आहे. माघारीचे सत्र संपल्याने आता प्रचाराचा धुरळा उडाला असून इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे.

येत्या 18 सप्टेंबर रोजी मतदान यंत्रात उमेदवारांचे भवितव्य बंद होणार असून 19 सप्टेंबर रोजी कुणाचे नशीब जोरावर असणार हे स्पष्ट होणार आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रंगत वाढली असून इच्छुकांमध्ये विशेष जोश बघायला मिळत आहे. शेवटी कोणाचे पारडे जड राहणार यावर चर्चेने जोर धरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com