दिंडोरी अतिक्रमणाचा मुद्दा न्यायालयात; 'या' दिवशी होणार उच्च न्यायालयात सुनावणी

दिंडोरी अतिक्रमणाचा मुद्दा न्यायालयात; 'या' दिवशी होणार उच्च न्यायालयात सुनावणी

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

नुकतेच राज्यातील सरकारी गटामधील अतिक्रमण (Encroachment) काढण्याच्या न्यायालयीन आदेशाची मोठी चर्चा आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तसेच शासकीय घरकूल धारकांनाही नोटीसा मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिंडोरी (dindori) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) हद्दीतील एकुण 536 नागरिकांची याचिका दिंडोरीचे नगरसेवक अ‍ॅड. गणेश बोरस्ते व हेमंत पगारे यांनी दाखल केली असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

माजी आमदार रामदास चारोस्कर (Former MLA Ramdas Charoskar) यांच्या मार्गदर्शनाने दिंडोरीचे नगरसेवक अ‍ॅड. गणेश बोरस्ते, हेमंत पगारे यांनी नुकतेच बाळासाहेबाची शिवसेनेचे राज्य समन्वयक (State Coordinator of Shiv Sena) माजी महापौर नरेश मस्के (Former Mayor Naresh Maske) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली.

यावेळी अतिक्रमणाबाबत (Encroachment) मिळालेल्या नोटीसांवर निर्णय घेण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच दिलासा दायक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यासंदर्भात निवेदन (memorandum) देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करतांना जिल्हाधिकार्‍यांनी जो काही आदेश पारित केलेला आहे तो बेकायदेशीर असून त्यांनी उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून सदरचा आदेश पारित केला आहे.

त्या आदेशानुसार दिंडोरी (dindori) नगरपंचायतीने चुकीची व बेकायदेशीर नोटीस पाठवल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिंडोरी शहरांमध्ये 536 घरांना सदरची बेकायदेशीर नोटीस आली आहे. नोटीसीमध्ये शासनाच्या कोणत्या गटांमध्ये अतिक्रमण (Encroachment) केले आहे. जो पर्यंत शासकीय गटाची मोजणी होत नाही तो पर्यंत कुठल्या गटात कुणी अतिक्रमण केले याची माहिती कशी मिळू शकते? घरकूल लाभार्थ्यांना देखील नोटीसा देणे हे आश्‍चर्य कारक आहे.

मुळात हे सर्व बेकायदेशीर असल्याचे नमुद करत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा समज करून नगरपंचायतीने नोटीस पाठवली असल्याचे मत व्यक्त करत त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती नगरसेवक अ‍ॅड. गणेश बोरस्ते व हेमंत पगारे यांनी दिली आहे. सदर याचिकेची सोमवारी सुनावणी आहे व त्यामध्ये दिंडोरीच्या 529 घरमालकांना दिलासा मिळेल याची आम्हाला खात्री असल्याचे अ‍ॅड. गणेश बोरस्ते व हेमंत पगारे यांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांनी हतबल होवू नये, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक तो प्रशासकीय लढा उभा केला जाईल त्यातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यात यशस्वी होवू, याची आम्हाला खात्री आहे.

- रामदास चारोस्कर, माजी आमदार, दिंडोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com