दिंडोरी वार्तापत्र: शिक्षक मुजोर आणि दुर्बल पालक

दिंडोरी वार्तापत्र: शिक्षक मुजोर आणि दुर्बल पालक
USER

दिंडोरी | संदीप गुंजाळ | Dindori

तालुक्यातील जानोरी (janori) येथील जि प शाळेत (zilha parishad school) विद्यार्थिनीला (students) वर्गात प्रवेश नाकारल्याची घटना घडताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिक्षणाधिकार्‍यांनी त्याची चौकशी लावून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले.

परंतु गावकरी मात्र या प्रकरणाला मुख्याध्यापकांनाच (headmaster) दोषी धरत त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत संबंधित मुख्याध्यापकाची इतरत्र बदली करण्याबाबत मागणी केली आहे. प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणून देऊनही अशा वादग्रस्त मुख्याध्यापकाची उचलबांगडी का केली जात नाही असा सवाल हा यानिमित्ताने आज उपस्थित केला जात आहे. शिक्षक (teacher) मुजोर, मुख्याध्यापक अकार्यक्षम आणि पालक दुर्बल अशी परिस्थिती आज ग्रामीण भागात (rural area) बघावयास मिळत असुन याला कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

जानोरी येथील शाळेतील मुख्याध्यापक गेल्या नऊ-दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. संवर्ग-1 मध्ये ते मोडत असल्याने त्याचा पुरेपूर गैरफायदा ते घेत आहेत की काय? अशी शंकाच यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. एखाद्या मुख्याध्यापकाच्या आडमुठेपणामुळे शाळेचा विकास खुंटत असेल आणि प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून देऊनही प्रशासन गंभीरपणे त्यास घेत नसेल तर त्यापेक्षा दुर्दैव कोणते नाही .शिक्षण (education) घेण्याचा अधिकार प्रत्येक घटकाला आहे . परंतु त्या हक्कावरच गदा आणण्याचे काम जानोरी सारख्या शाळेत झाला असेल तर ते मोठे दुर्भाग्याचे म्हणावे लागेल.

पटसंख्या वाढते म्हणून वर्गात शिक्षक (teacher) बसू देत नसतील तर मुख्याध्यापक तेव्हा काय करत होते? संबंधित शिक्षकाकडे पालकाला मी पाठवले म्हणून सांगा असे सांगून देखील शिक्षकांनी ऐकले नसेल तर मुख्याध्यापकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणारच. शिक्षक वर्गात घेत नाहीत म्हणून दिवसभर विद्यार्थिनीला मुख्याध्यापक स्वतःच्या कार्यालयात बसून ठेवत असतील तर या प्रशासन कारभाराला कोणते नाव द्यावे हेच कळत नाही. मुख्याध्यापकांनी स्वतःचा अधिकार वापरून शिक्षकाला त्यांची सूचना मान्य करण्यास परावृत्त का केले नसेल? त्याचा शोध घेणे आवश्यक आहे.

काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापन समितीने (school management committee) संबंधित शिक्षक आपल्या कर्तव्यात जाणूनबुजून कसूर करतात यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून समज देण्यात यावी असा ठराव संमत केला होता. परंतु मुख्याध्यापकांनी त्या ठरावाला केराची टोपली दाखवली. जर वेळीच त्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती तर विद्यार्थिनीला प्रवेश नाकारण्यापर्यंत त्यांची मजल गेलीच नसती असे मत व्यक्त केले जात आहे. संबंधित शिक्षक संघटनेचे पदाधिकारी (teacher union officer) असल्यामुळे त्यांना सवलत देण्यात येते अशी चर्चा आहे.

संघटनेचे पदाधिकारी असले तर त्यांना कर्तव्यात कसूर करण्याची मुभा असते काय? हाही सवाल उपस्थित होतो. तालुक्यात बहुतेक पदाधिकारी आहेत परंतु आजपर्यंत त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याची चर्चादेखील कुठे नाही. परंतु अशा पदाधिकार्‍यांमुळे प्रामाणिक काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना बदनाम व्हावे लागते हे तितकेच खरे. ज्ञानदानासारख्या पवित्र ठिकाणी कर्तव्यातही राजकारण करून असे पदाधिकारी जर पदाचा दुरुपयोग करत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यापर्यंत त्यांची मजल जात असेल तर अशांना वेळीच आवर घालणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

जिल्हा परिषद शाळांना (zilha parishad school) आज सहकार्याची अपेक्षा आहे. अनेक जिल्हा परिषद शाळा आज सलाईनवर आहेत. गावकरी व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या योग्य समन्वयातून शाळेचा विकास होणे आवश्यक आहे . परंतु मुख्याध्यापकांचे गावकर्‍यांशी समन्वयाचे नाते नसेल तर नक्कीच त्या शाळेचा विकास खुंटेल यात शंका नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होवु शकतो. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित मुख्याध्यापक सहकारी शिक्षकांवरदेखील दडपशाहीचे धोरण ठेवत मनमानी कारभार करत असल्याची चर्चा आज सुरू आहे.

एखाद्या शिक्षकाने जर मुख्याध्यापकाच्या विरोधात बोलण्याची हिंमत केली तर त्यांना शुल्लक कारणावरून लेखी काढणे तसेच कारवाईच्या धमक्या देणे आदी विविध पर्याय अवलंबण्यात मुख्याध्यापक पटाईत असल्याचे बोलले जाते. आपल्याला गरज पडेल तेव्हा सहकारी शिक्षकांकडून बळजबरीने त्यांच्या बाजूने लेख्या लिहून घेण्यात देखील मुख्याध्यापक सरस असल्याचे बोलले जाते. अशा सूडबुद्धीने प्रशासन चालवणार्‍या मुख्याध्यापकाची तात्काळ इतरत्र बदली व्हावी अशी मागणी जानोरीकरांनी केली असून मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात गावकर्‍यांना आंदोलनापर्यंत वेळ येवू देणे हे नक्कीच घातक म्हणावे लागेल.

आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.शहरापासून जवळच्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उत्सुक असतात. त्यात संवर्ग -1 मध्ये येणार्‍यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रशासन यावेळी क्षमतेकडे न बघता तसेच संबंधिताचा इतिहास न बघता प्राधान्यक्रमाने त्यांना सोयीनुसार नियुक्ती दिली जाते. त्याला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत हा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होत आहे. संवर्ग -1 मध्ये येत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रारी येवून अथवा कार्यक्षम नसल्याचे सिद्ध होवूनही जर प्रशासन संबंधिताच्या मर्जीचाच विचार करणार असेल तर मुजोर अधिकारी अथवा कर्मचार्‍यांना आवर घालता येणार नाही हे देखील तितकेच सत्य आहे. त्यामुळे संवर्ग -1 च्या बदल्यांनाही काहीतरी मर्यादा घालून देण्याची आज गरज आहे.

पटसंख्या वाढण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविले जातात. यासाठी जिल्ह्यातील शाळांचा आटापिटा सर्वश्रुत आहे. दिवसेंदिवस दिवस इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वाढणारी पटसंख्या ही जिल्हा परिषद शाळेसाठी डोकेदुखी ठरत असल्याने जिल्हा परिषद शाळा त्यापेक्षा कशी सरस आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आज जिल्हा परिषद शाळेवर आली असतांना जानोरी जि.प. शाळेत पटसंख्या वाढू नये म्हणून विद्यार्थ्यांनीला प्रवेश नाकारला जातो हे विशेष. मुख्याध्यापक जर कार्यक्षम असते तर ही वेळ आलीच नसती या ग्रामस्थांच्या म्हणण्यात देखील तथ्यच आहे. एकुणच चर्चेचा विषय ठरलेल्या या विषयाला मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी कसा पुर्ण विराम देतात याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार ?

जानोरीच्या त्या विद्यार्थ्यीनीचा दाखला मुख्याध्यापकांनी दाखल केल्यानंतर वर्गात प्रवेश देण्याबाबत टाळाटाळ केल्याने या विषयाला सुरुवात झाली. संबंधित विद्यार्थ्यीनीच्या आज्जीने तसा लेखी खुलासा संबंधित विभागाच्या विस्तार अधिकारी यांना दिला होता. परंतु त्यातुन पळवाट काढत आम्ही दाखल केले होते असा कांगावा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या तुकडीत मुख्याध्यापकांनी बसवण्यासाठी पालकाला सांगितले होते त्या तुकडीत पटसंख्या कमी असुनही शिक्षकानी त्या विद्यार्थीनीला दाखल करून घेतलेले नाही हे विशेष ! आता वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com