करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

दिंडोरी : लखमापूरच्या करोना बाधिताचा मृत्यू

खेडगावात सहाव्या संशयिताचा मृत्यू

Abhay Puntambekar

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील इसमाचा (५५) करोनामुळे मृत्यू झाला असून दुसर्‍या एका संशयित इसमाचा खेडगावला मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालूक्यातील मृतांची संख्या सहा झाली आहे.

दिंडोरी तालुक्यात आता करोनाच्या  संसर्गामुळे सामान्य जनता हादरली आहे. तालुक्यात करोनाग्रस्तांची संख्या १२५ च्या वर जाऊन पोहचली आहे. पिंपरखेड आश्रमशाळेपाठोपाठ आता बोपेगाव  आश्रमशाळेतही संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे.वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. आता यत्रणा सर्व ताण सहन करीत रुग्णांना उपचार देण्याचे काम करीत आहे. रुग्ण संख्या वाढत असतांनाही दुसरीकडे नागरिक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत.रस्त्यावर गर्दी दिसत आहे.

आरोग्य यंत्रणा , आशा वर्कस काम करीत आहे.लखमापुर येथील रुग्णाचाही करोनाने मृत्यु झाला आहे.  या रुग्णाला किरकोळ त्रास असल्याचे समजते.कोणत्या तरी नातलगाच्या माध्यमातुन संसर्ग झाल्यानंतर नाशिक येथील एका रुग्णालयात उपचार सुुरु होते.परंतु फुफ्फुस निकामी झाल्यांने त्यांचा मृत्युं झाला.

लखमापुरात करोनाचे रुग्ण आहेत.ग्रामपंचायत आणि आरोग्य यंत्रणेने गाव अनेक वेळा निजर्तुकिकरण केले. परंतु बाहेरुन करोेनाचे संक्रमण झाल्याने करोेनाचे रुग्ण वाढले.यानंतर गावाने आता खबरदारी घेतली आहे. दरम्यान खेडगाव यथील ५५ वषीय संशयिताचाही मृत्यू झाला असून त्याच्या घरातील सर्व व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com