दिंडोरी : औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल

लखमापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली फिर्याद
दिंडोरी : औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल

दिंडोरी | प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून करोनाचा संसर्ग कारणीभुत ठरल्याप्रकरणी हेक्झागॉन,एव्हरेस्ट या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेक्झागॉन कंपनीत सुमारे १५० ते २०० कामगार आहेत. या कंपनीत उत्पादन सुरु केल्यानंतर कंपनीत आरोग्यबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.

कंपनीला सुचना केल्यानंतरही कंपनीचे व्यवस्थापकाने कामगारांची व अधिकार्‍यांची सुरक्षितता जपली नाही. त्यामुळे कंपनीमध्ये १२ कामगारांना करोनाचा प्रादुर्भाव झाला.

या कारणास्तव कंपनीचे व्यवस्थापकावर लखमापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्याचप्रमाणे ऐव्हरेस्ट कंपनीमध्येही कामगारांना लागण झाली. या कंपनीत ३०० ते ३५० कामगार आहेत.

परंतु सर्वच कामावर नाही. कंपनीचे उत्पादन सुरु असताना कंपनीत व्यवस्थापनाला कोविड आजाराबाबत काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु तरी सुध्दा कंपनीच्या व्यवस्थापनाने खबरदारी घेतली नाही.

प्रशासनाने स्वॅब घेतले असता सुमारे ४७ कामगार करोना बाधित आढळून आले. त्यामुळे लखमापूरचे ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी कंपनीचे व्यवस्थापक जब्बार नभिखाल पठाण व सहव्यवस्थापक विजेंद्र बाबु यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये व साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेक्झागॉन, एव्हरेस्ट या दोन्ही कंपन्या तालुक्यातील मोठ्या कंपन्या असून या कंपन्यांनी वास्ताविक काळजी घ्यायला हवी होती.

परंतु पाहिजे तशी दक्षता न घेतल्याने करोनाचा संसर्ग वाढला. लखमापूर औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांनीही कामगारांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, परिसर निर्जुतीकरण करावा, असे आवाहन लखमापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com