येत्या सोमवारी दिंडोरी बंद

दिंडोरी शहर
दिंडोरी शहर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

लखीमपूर (Lakhimpur) येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवार (दि.11) रोजी दिंडोरीत बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरग गणोरे, माकपाचे तालुकाध्यक्ष रमेश चौधरी, स्वाभिमानी शेतकरी सघंटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप (Swabhimani Shetkari Sanghatna) यांनी सयुंक्तिक बंदचे आवाहन केले आहे....

कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल आव्हाड यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपुर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकर्‍यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होते. परंतु तेथे भाजपाचे सरकार असुन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्याने शेतकर्‍यांना चिरडले.

अगोदरपासुन भाजपाची भुमिका (BJP role about farmers) ही सामान्य जनतेच्या विरोधात असुन हुकुमशाही पदधतीने अन्यांय अत्याचार भाजपाने चालवलेला आहे. शेतकर्‍यांना चिरडणार्‍या आरोंपींना शासन करण्याऐवजी पाठीशी घालण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. शेतकर्‍यावर गाडी घालुन आंदोलन चिरडणार्‍या भाजपाच्या नेत्यांना अटक करावी व गरीब शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने व शेतकर्‍यांनी दि.11 रोजी दिंडोरी बंदचे आवाहन केले आहे.

सामान्य शेतकर्‍यांना न्याय मिळावा व भाजपाच्या (BJP) निषेधार्थ या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन कॉग्रेस तालुकाध्यक्ष (Congress Taluka president) सुनिल आव्हाड, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष (NCP Taluka President) भास्कर भगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख (Shivsena Taluka president) पांडुरंग गणोरे, माकपाचे तालुकाध्यक्ष (MKP president) रमेश चौधरी, कॉग्रेस शहराध्यक्ष गुलाब जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नरेश देशमुख, शिवसेनेचे शहराध्यक्ष संतोष मुरुकुटे, आप्पा वाटाणे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com