दिंडोरी : तालुक्यात करोनाच्या नवीन रुग्णांची भर

नविन ९ रुग्णांची नोंद
दिंडोरी : तालुक्यात करोनाच्या नवीन रुग्णांची भर
करोना

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तालुुक्यात 9 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळल्याने करोना ग्रामीण भागात पसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे. करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.दिंडोरी तालुक्यात 9 करोना बाधित आढळले. गेल्या काही दिवसात करोनाची साखळी तुटल्याचे दिसून येत होते. परंतु आज आढळलेल्या रुग्णांमुळे करोना ग्रामीण भागात पसरलेला दिसतो.

दिंडोरी शहरातील टेलिफोन कॉलनीत 6 वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली. त्याचप्रमाणे बसस्थानकाजवळील लक्ष्मी अपार्टमेटमध्ये 34 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली. वरखेडा गावात चार जणांना आज करोना झाल्याचे आढळले. वरखेडा येथे दोन महिला व एक पुरुष, एक बालक यांना करोनाची लागण झाली.

मडकीजांब येथे 50 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. खडकसुकेणे येथेही 50 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली.पुर्वी लखमापूर फाटा येथील एव्हरेस्ट, हॉयमिडीया, हेक्झागॉन या कंपन्यावर कारवाई केल्याने ग्रामीण भागातील संसर्ग काही प्रमाणात थांबला आहे. तरी सुध्दा जे कर्मचारी परिसरातील गावात रहात होते, त्यांच्या घरातील व्यक्ती काही ठिकाणी बाधित झाल्याचे आढळून येतात.

दोन दिवसांपुर्वी धुमाळ कंपनीचा एक कामगार बाधित झाला आहे. वणी येथे 23 वर्षीय तरुण व रामशेज येथेही 26 वर्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह आला आहे. तुंगलदरा येथे 1 पुरुष, एक 7 व एक 8 वर्षीय मुलगा करोना बाधित झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमुळे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे.

पॉलिझिंटा कंपनीतही करोना बाधित रुग्ण आढळल्याची चर्चा होती. तथापि अवनखेड ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीही माहिती पॉलिझिंटा कंपनीने दिलेली नसल्याचे ग्रामसेवक विनोद आहिरे यांनी सांगितले. तथापि अवनखेड ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनीही कंपनीत असलेला कामगार संशयित असल्याचे सांगितले. कंपनीचे व्यवस्थापिका सुचित्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सध्या तालुक्यातील काही कंपन्यांनी कामगारांकडून करोनाच्या पार्श्‍वभुमीवर हमीपत्रे लिहुन घेतल्याचे वृत्त आहे. अनेक कंपन्या सुरु झाल्या असल्या तरी कामगारांना आपल्या जीवावर उदार होवून कामावर जावे लागत आहे. करोना झाल्यानंतर दुरुस्तीची जबाबदारी कामगारांनाच घ्यावी लागत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com