दातलीत आज दिंडीचे रिंगण

दातलीत आज दिंडीचे रिंगण

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या ( Saint Nivruttinath Maharaj )पादुका पांडुरंगाला भेटण्यासाठी मार्गक्रमण करत असताना आज (दि.17) दुपारी 3 वाजता पालखीचे दातलीत ( Datli )आगमन होणार आहे. दातली पंचक्रोशीतील भजनी मंडळ पखवाद मृदुंग टाळांच्या गजरात पालखीचे स्वागत करणार आहे. चार वाजेपर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार असून त्यानंतर पालखी सोहळ्यातील पहिले वारकरी रिंगण ( Warkari Ringan )दातली येथील साडेतीन एकर क्षेत्रावर रंगणार आहे.

लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके यांच्या मालकीच्या गट नंबर 360 मधील क्षेत्रावर रिंगण सोहळा रंगणार आहे. सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे मुख्य प्रशासक अधिकारी अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी चार दिवसांपूर्वी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते. मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौधरी यांच्या पथकाने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने रिंगण सोहळ्याच्या मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता करण्यात आली. पादुका मंदिर सुशोभीत करून स्वागतासाठी सज्ज आहे. वारकरी संप्रदायातील डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, सुदाम महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, किशोर महाराज खरात, भगीरथ महाराज काळे, योगेश महाराज आव्हाड, जालिंदर महाराज दराडे व तालुक्यातील सर्व वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या मदतीने सोहळा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com