कार्तिकी वारीसाठी त्र्यंबकेश्वरमधून प्रथमच दिंडी

कार्तिकी वारीसाठी त्र्यंबकेश्वरमधून प्रथमच दिंडी

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar

कार्तिक वारीसाठी Karthiki vari त्र्यंबकेश्वर Trimbakeshwar येथून यंदा प्रथमच वारकर्‍यांची पायी दिंडी रवाना झाली. यंदा प्रथमच काही वारकर्‍यांनी मिळून कार्तिक वारीची प्रथा सुरू केल्याचे पंडित महाराज कोल्हे यांनी सांगितले. कोल्हे महाराज हे संत निवृत्तिनाथ मंदिराचे माजी अध्यक्ष व विश्वस्त आहेत. वै. लक्ष्मीबाई गयाजी पाटील-कोल्हे असे या दिंडीचे नामकरण करण्यात आले आहे. दिंडीसाठी संत निवृत्तिनाथांच्या चांदीच्या पादुका बनवून घेतल्याचे कोल्हे महाराज यांनी सांगितले.

संत निवृत्तिनाथांच्या समाधीला चरण पादुका लावून पंढरीच्या कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान संत निवृत्तिनाथ महाराज मंदिरातून झाले. 40 वारकर्‍यांच्या उपस्थितीत नाथांच्या चरण पादुकांना कुशावर्ती स्नान घालून पुढे त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पायी सोहळ्याचे टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान झाले.

नाशिकरोड, सिन्नर, लोणी, कोल्हार, राहुरी, नगर, मिरजगाव करमाळा, पंढरपूर अशा राजमार्गाने आठ दिवसांचा प्रवास करून 14 नोव्हेंबरला दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. दशमी, कार्तिक एकादशीचा उत्सव करून द्वादशीला काल्याच्या कीर्तन महाप्रसादाने सांगता होईल. पालखी काल अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली.

दिंडी मार्गात ठिकठिकाणी नाथांच्या कार्तिकी पायी सोहळ्याचे स्वागत होत आहे. यंदा कार्तिक वारी 15 नोव्हेंबर या दिवशी भागवत एकादशीला आहे. ही दिंडी वैयक्तिकरीत्या वारकर्‍यांनी काढली आहे. दरम्यान, त्र्यंबकमधून आषाढी वारी पंढरपूर यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ मंदिर संस्थानची पायी दिंडी पालखी रथ नेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com