
निफाड | प्रतिनिधी | Niphad
तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pimpalgaon Baswant APMC) सभापतीपदी दिलीप बनकर (Dilip Bankar) तर उपसभापतीपदी जगन कुटे (Jagan Kutte) यांची बिनविरोध निवड करण्यात आली...
सकाळी अकराच्या सुमारास दिलीप बनकर गटाच्या ११ सदस्यांचे बाजार समिती हॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर प्रशासक सविता शेळके (Savita Shelke) यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी दिलीप बनकर गटाचे संचालक जगन कुटे यांची उपसभापतीपदी बिनविरोध (Unopposed) निवड झाली.
मात्र, सभापतीपदासाठी आमदार दिलीप बनकर व अनिल कदम गटाचे संचालक गोकुळ गीते यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी झालेल्या गुप्त मतदानावेळी बनकर यांना ११ तर गोकुळ गीते यांना ६ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार यतीन कदम तटस्थ राहिले.
दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार (Police Inspector Ashok Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शेतकरी हिताला प्राधान्य
कांदा दरात घसरण सुरूच आहे. याबाबत शासनस्तरावर प्राधान्याने प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदीचा कसा फायदा होईल, याकडेही लक्ष दिले जाईल.
दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती