कटिंग-दाढी करायचीय, मग असा लावा ऑनलाईन नंबर

नाशिकच्या तरुणांनी तयार केले डीजीटल अँप
कटिंग-दाढी करायचीय, मग असा लावा ऑनलाईन नंबर

नाशिक | Nashik

सलोनमध्ये (Saloon) जाताना मनात कुठलेही प्रश्न ठेऊ नका जसे किती वेळ लागेल? सर्व्हिस कशी असेल? रेट्स कसे असतील? आणि महत्वाचे म्हणजे कोविड (Corona Crisis) ची खबरदारी घेतली जाते का?

या सर्व प्रश्नांवर उपाय उच्चशिक्षित तरुणांनी (Educated Youth) शोधला आहे. या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सलून मध्ये जाण्याआधीच मिळणार आहे.

पर्यटन व तीर्थ क्षेत्रासह (Tourism) विशेष कारणांनी प्रसिद्ध असलेले, देशाची वाईन कॅपिटल (Wine Capital) म्हटल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये बरेचसे स्टार्टअप (Nashik Start-up) उगम पावत आहेत. लॉकडाउन च्या कठीण काळातच अंकुश संत (Ankush Sant And Jay Nikam) व जय निकम या बालपणीच्या मित्र असलेल्या नाशिकच्या दोन इंजिनिअर तरुणांनी (Engineer Student's) एका मोठ्या समस्येवर मार्ग शोधून काढलाय आणि तो आता यशस्वी ठरतोय.

कोविड १९ मुळे सलून व्यवसायिकांपुढे तर दुकान बंद (Saloon Profession) ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण सलून मध्ये होणारी गर्दी हि व्यवसायकांच्या तसेच ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरल्यामुळे दुकान बंद ठेवल्याने व्यावसायिकांची उपासमार (starvation of professionals) व्हायला लागली. अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला आधार देण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे.

भारताची वाटचाल डिजिटल इंडिया (Digital India) बनण्याकडे होती परंतु अनपेक्षित पणे होणाऱ्या बदलांमुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म (Online Platform) पर्याय असल्यामुळे लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळण्यास सुरवात झाली आहे.आज प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असल्यामुळे लोक विविध ऑनलाईन सुविधांचा लाभ घेतात. नेमकी हीच गोष्ट या तरुणांनी ओळखली, आणि बुक द सलून नावाचे अँप विकसित केले. यात शहरातल्या सर्व सलून ची माहिती आहे.

सलोनची वेळ, सर्व्हिसेस च्या किमती, ऑफर्स, प्रॉडक्ट्स हे सर्व ग्राहकांना ऍपद्वारे कळणार आहे. जेणेकरून ग्राहक त्यांच्या सोयीनुसार ऍडव्हान्स बुकिंग घेऊ शकतात. गर्दीपण होत नाही आणि त्यांचा वेळ वाचतो. सामाजिक अंतर ठेवण्याचे चांगले साधन मिळाले. दुकानदारांनाही येणाऱ्या ग्राहकाची आधीच कल्पना असल्याने ते चांगली सर्व्हिस देऊ शकतात. सलून व्यावसायिकाकडून या ॲपला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. स्टार्टअप सुरु केल्यापासून पहिल्या तीनच दिवसात ५० सलून व पार्लर या ॲप ला जोडली गेली आहेत. या तरुणांच्या प्रयत्नाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

यासाठी व्यावसायिकांनी playstore वरून Book The Salon Partner नावाचे ॲप डाउनलोड करून घ्यावे. ग्राहकांसाठी पण Book The Salon Customer app उपलब्ध झाली आहे.भविष्यात राज्यभरात ही सुविधा लवकरच सुरू करण्याचा माणस आहे.

सलून व्यवसायाला डिजिटल ओळख मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याचा व्यावसायिकांना व ग्राहकांना निश्चितच फायदा होईल त्यामुळे ऑनलाईन सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या सुविधा वापरावी हि विनंती.

- अंकुश संत, उच्चशिक्षित तरुण.

पंचवटीतील दोन उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या पारंपारिक व्यवसायाला आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची जोड देत समाजाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचा निश्तिच व्यवसायीकांना फायदा होईल.

-अभिजीत राऊत, अध्यक्ष पंचवटी युवक विकास समिती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com