डिजिटल राखी ठरली लक्षवेधी

डिजिटल राखी ठरली लक्षवेधी

येवला | प्रतिनिधी | Yeola

येथील धडपड मंचचे वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनानिमित्त (Rakshabandhan) एक भव्य राखी बनविली आहे. ही राखी संपूर्ण डिजिटल (Digital) बनविण्यात आली आहे. त्यास आकर्षक विद्युत रोशनाईदेखील करण्यात आली आहे....

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आई, बाबा कडुन खाऊ सर्वात पहिले कोणाला मिळणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना व्हॉट्सॲप, फेसबुक फोन किंवा चॅटद्वारे भेटून एकत्र सण साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.

त्यामुळे ह्या सणवारांचे महत्व कमी होत चालले आहे. या पारंपारिक सणाची आठवण राहावी व सणाचे एक मंगलमय वातावरण टिकून राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंच कायमच प्रयत्नशील असते.

त्याच उद्देशाने शहरातील मध्यावधी ठिकाण असलेले मेनरोड येथे ही राखी लावण्यांत आली आहे. ही राखी येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला ही विशाल राखी तसेच दिवाळीत मोठा आकाश कंदील, संक्रांतीला मोठा पतंग लावण्याची धडपड मंचची परंपरा आजही टिकून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com