डिजिटल आर्थिक व्यवहार गरजेचे : तनपुरे

पाथरे येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन
डिजिटल आर्थिक व्यवहार गरजेचे  : तनपुरे

पाथरे । वार्ताहर Pathare

संगणक आणि स्पर्धेच्या युगात शेतीशी निगडीत असलेल्या ग्रामीण भागातील ( Rural Areas ) प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक व्यवहार (Financial transactions) विनाविलंब होणे गरजेचे आहेत. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने डिजिटल पध्दतीने (Financial transactions through Digital System )व्यवहार केले पाहिजे. डिजिटल व्यवहार 24 तास कधीही करु शकता असे प्रतिप्रादन नाशिक जिल्हा मध्यवर्ती मुख्याधिकारी प्रविण तनपुरे यांनी केले.

पाथरे येथे जिल्हा बँकेच्या पाथरे शाखेच्या व पाथरे परिसरातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या पाथरे विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक तथा नाबार्डच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक तथा माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र घुमरे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर बँकेचे जनरल मॅनेजर नितीन ओस्तवाल, मुख्याधिकारी रमेश शेवाळे, बाळासाहेब बेंडकुळे, विभागीय अधिकारी भरत आरोटे, बँक निरीक्षक राजेश नवाळे, कैलास निरगुडे, गंगाधर शिंदे, दिलीप शिंदे, भाऊसाहेब शिंदे, माजी सभापती राजेंद्र घुमरे, विकास संस्थेच्या अध्यक्षा लताताई बारहाते, उपाध्यक्ष गंगाधर सुडके उपस्थित होते. या स्पर्धेच्या युगात कृषी क्षेञात प्रत्येकाला आर्थिक व डिजीटल साक्षर होणे गरजेचेच आहे.

आपले आर्थिक व्यवहार संगणक प्रणालीद्वारे समजून घेता आली पाहीजे. 12 जुलै 1982 हा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचा स्थापना दिवस आहे. बँक आता पूर्व पदावर येत असल्याने सभासद, ग्राहक कार्यक्रमाचे प्रास्तविक बँक निरीक्षक कैलास निरगुडे यांनी केले. सभासद, ग्राहक यांच्याशी बँकेच्या पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र घुमरे यांनी बँक आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे असून बँकेला पुन्हा वैभव प्राप्त होण्यासाठी सर्वानी विश्वास दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यास पाथरे बुद्रुकच्या सरपंच सुजाता नरोडे, पाथरे खुर्द चे सरपंच विष्णुपंत बेंडकुळे, वारेगावच्या सरपंच मंदाताई दवंगे, सुधाकर शिंदे, चांगदेव गुंजाळ, शिवाजी चिने, नवनाथ नरोडे, प्रतिक शिंदे, भाऊसाहेब चिने, भाऊसाहेब नरोडे, संदिप बुब, राजेंद्र दवंगे, सुभाष सोनवणे, दशरथ शिंदे, बाबासाहेब पाटील, रवींद्र चिने, आबा राहाणे, नामदेव भवर, सोपान पाचोरे, हरिदास चिने, संपत चिने, अनिल गुंजाळ, प्रमोद नरोडे यांच्यासह पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, ,वारेगांव, कोळगाव -माळ, सायाळे, मिरगांव, येथील सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत, सदस्य उपस्थित होते.

मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश कुमावत, किरण महात्मे संदिप लोखंडे, उध्दव पाटील, मयुर खांडरे, दिलीप शिंदे, सचिव गुलाब चतुर, भाऊसाहेब नरोडे, सुनील चिने, अनिल गिते यांनी परिश्रम घेतले. यावेळी पाथरे सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कैलास निरगुडे यांनी केले. आभार भरत आरोटे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com