ई-पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी
ई पीक पाहणी

ई-पीक पाहणी नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शेतकऱ्यांनी (Farmers) स्वतः ई-पीक अॅपवर (E-Peak App) आपापल्या पिकांची माहिती भरण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. ही माहिती भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून त्यास शेवटचे पाचच दिवस उरले आहेत.

शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणीची नोंदणी (Registration of e-crop survey) करावी, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या (Revenue Administration) वतीने करण्यात आले आहे.मात्र, सद्यःस्थितीत नेटवर्क (Network) समस्या, तांत्रिक अडचणी, जनजागृतीचा अभाव यामुळे या मोहिमेला जिल्ह्यात अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र जिल्हाभर आहे.

ई-पीक पाहणी आणि पीक - पेऱ्याच्या नोंदीत प्रशासकीय यंत्रणेकडून तलाठी (Talathi), कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सेवकांकडून अनेकदा त्रुटी राहत होत्या. त्यामुळे वारंवार महसूल आणि कृषी विभागाला टीकेचे धनी व्हावे लागत होते. शिवाय स्वतः तलाठी आणि इतर विभागांकडून करण्यात

येणारी ई-पीक पाहणीची वेळखाऊ

येणारी ई-पीक पाहणीची वेळखाऊ प्रक्रिया शेतकऱ्यांना अनेकदा मारक ठरत होती. त्याविरोधात कायम शेतकऱ्यांकडून आंदोलने करून नाराजी व्यक्त केली जात होती. यावर उपाय म्हणून शासनाने आता मोबाईल अॅपद्वारे (Mobile App) शेतकऱ्यांना सोय उपलब्ध करून दिली आहे.

शेतकरी स्वतः आपली पीक पाहणी नोंदवू शकतात. तलाठी केवळ त्या नोंदी प्रमाणित करतील. त्यामुळे वेळ वाचणार आहे. शिवाय यात सत्यता आणि पारदर्शकताही येणार असून, शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही टळणार आहे.

ही प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात (Nashik District) महिनाभरापासून सुरू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.त्यातच १५ सप्टेंबरपर्यंतच शेतकऱ्यांना ई-पीकपेरा नोंदणीची सुविधा आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली पीक पाहणीच्या नोंदी अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com