Video : सजवलेल्या बैलगाडीतून आले नवरदेवासह वऱ्हाडी; एका पारंपारिक लग्नाची गोष्ट

Video : सजवलेल्या बैलगाडीतून आले नवरदेवासह वऱ्हाडी; एका पारंपारिक लग्नाची गोष्ट

हरसूल | पोपट महाले Harsul

अलीकडे लग्नामध्ये अनेक वेगवेगळे फंडे वापरले जाताना आपण बघितलेच आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र नुकत्याच एका लग्नाची वरात चक्क बैलगाडीने निघाली. अनेक किमीचा प्रवास करून नवरदेवाने लग्नघर गाठले...(different wedding bullock cart wedding guests)

विश्वास बसणार नाही असे ड्रोन कॅमेऱ्याने (Drone Camera Shooting) सर्व शुटींगदेखील यावेळी करण्यात आले आहे. आजूबाजूची हिरवाई आणि वळणावळणांचा रस्ता यातून निघणारे बैलगाडीवरील वऱ्हाड (Bullock cart wedding) आदिवासी चालीरीती (Tribal), परंपरा यांना जणू आपलेसे करताना दिसले.

नवरदेवाने बैलगाडी हाकत वऱ्हाडी मंडळींना धक्का दिला. या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सर्वदूर शेअर झाल्यामुळे या लग्नाची मोठी चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

अधिक माहिती अशी की, येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक काशीराम कनोजे (Social workers pundalik kanoje) यांचे चिरंजीव पद्माकर आणि शिरसगाव येथील मोहन यशवंत साबळे यांची कन्या विजया यांचा शुभविवाह नुकताच पार पडला.

या लग्नसोहळ्यासाठी वाढती महागाई, पेट्रोल, डीझेल, भाडेवाढ आणि आदिवासी लयास चाललेली परंपरागत चालीरीती विचारात घेऊन सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कनोजे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात बैलगाडी ताफा सजविला.

यामुळे आदिवासी परंपरेला उजाळा देत नवरदेवाने आपल्या बैलगाडीच्या तांड्यात प्रवास करत लग्नस्थळ गाठले. बैलगाडी आणि बैलाची आकर्षक सजावट सर्वांचे मन वेधून घेत इतरांना फोटो सेशन करण्यासाठी भाग पाडत होती.

यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारे यांनी एकाच गर्दी केली होती. या बैलगाडीच्या तांड्यात अनेक नेतेमंडळी तसेच वऱ्हाडी मंडळींनी प्रवास करत लग्नस्थळ गाठत आनंद व्यक्त केला. जुन्या आदिवासी चालीरीतीच्या आठवणींनीना उजाळा मिळाल्याने बैलगाडी तांडा हरसूल भागात चर्चचा विषय ठरला आहे.

Related Stories

No stories found.