प्रश्न जीवन मरणाचा अन् भ्रांत पोटाची

प्रश्न जीवन मरणाचा अन् भ्रांत पोटाची

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोदावरीत (Godavari) पुराच्या (Flood) पाण्याची पातळी वाढत आहे. आपापली वाहने..चार चाकी..दुकाने-टपऱ्या...दुकानांमधून मौल्यवान वस्तू त्वरित बाजूला काढून वाचवा...आपला जीव महत्त्वाचा आहे...पाण्यात उतरू नका...पुराच्या पाण्यापासून दूर राहा...असे आवाहन महानगरपालिका (NMC) व पोलीस (Police) प्रशासनाकडून गोदावरी पात्रात लगतच्या लोकांना केले जात होते...

अशी परिस्थिती एकीकडे असताना काही युवक मात्र आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पुराच्या (Flood) पाण्यात वाहून आलेले मासे जाळे टाकून पकडण्यात मग्न होते.
गोदावरीला (Godavari) सोमवारी (दि.११) सकाळपासूनच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीमुळे पुराच्या पाण्यात दुकाने, टपऱ्या, भाजीपाला, विविध मौल्यवान वस्तू वाहून जाऊ नये, त्या पुरातून कशा वाचवता येतील,यासाठी येथील विक्रेत्यांची व दुकानदारांची एकच धावपळ सुरू होती.

जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे व्यवसायिकांकडून जीव मुठीत धरत आपल्या किमती वस्तू वाचवत जगण्याची धडपड एकीकडे सुरू होती. त्याचवेळी दुसरीकडे आपल्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांतही काही व्यक्तींना असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

पूराच्या पाण्यात वाहून आलेले मासे पकडून दोन वेळचे जेवण होईल किंवा पकडलेल्या माशांतून विक्री करून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मासे (Fish) पकडताना युवक दिसून आले.

श्वानांचीही जीव वाचवताना धावपळ

महानगरपालिका (NMC), पोलीस (Police) प्रशासनाकडून नागरिकांना पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याचे सांगत जागरूक करण्यात येत होते. या जागरूकतेच्या आवाहनाचा मुक्या प्राण्यांवर मात्र कुठलाही परिणाम झाला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. पूर परिस्थितीच्यावेळी गोदा पात्राच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे श्वान फिरत होते. त्यावेळी पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. ती इतकी वाढली की या श्वानांना पाण्यातून बाहेर पडताना हे जिकरीचे होऊन बसले. त्यांना अखेर बॅरिकेड्सचा आधार भेटला अन ते पाण्यातून सुखरूप बाहेर पडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com